शहरं
Join us  
Trending Stories
1
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
2
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
3
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
4
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
5
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
6
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
7
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
8
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
9
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
10
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
11
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
12
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
13
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
14
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
15
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
16
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
17
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
18
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
19
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
20
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने घेतली विधानसभेची धास्ती

By admin | Updated: May 18, 2014 00:59 IST

लोकसभेचा निकाल काँग्रेससाठी धक्कादायक आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सहापैकी चार जागा गमविल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी परतीसाठी कंबर कसली होती.

नागपूर : लोकसभेचा निकाल काँग्रेससाठी धक्कादायक आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सहापैकी चार जागा गमविल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी परतीसाठी कंबर कसली होती. मात्र, विधानसभेच्या सहाही मतदारसंघात कमळ फुलल्याने काँग्रेस नेत्यांची हिम्मत खचली आहे. ‘कम बॅक’च्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. पूर्व, दक्षिण व दक्षिण पश्चिममध्ये ६० हजारावर आघाडी, पश्चिम व मध्यमध्ये ४० हजारावर लीड व उत्तरेलाही लावलेला सुरुंग पाहता येत्या निवडणुकीत नागपुरात काँग्रेसला एक एक जागा वाचविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे. विधानसभेच्या सहा जागांपैकी उत्तर नागपूर (रोहयो मंत्री नितीन राऊत) व दक्षिण नागपूर (आ. दीनानाथ पडोळे) या दोनच जागा काँग्रेसकडे आहेत. उर्वरित चारही जागा भाजपच्या ताब्यात आहेत. लोकसभा निवडणुकीत सहाही मतदारसंघात भाजपने भरभरून आघाडी घेतली आहे. त्यामुळे गेल्यावेळी हरलेले व या वेळी लढण्यासाठी पूर्ण तयारी केलेल्या काँग्रेस नेत्यांसह काँग्रेसच्या सिटिंग आमदारांसाठीही धोक्याची घंटा आहे. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी पूर्वची लीड कमी करू शकले नाहीत. स्वत: ३५ हजारांनी जिंकलेले आ. दीनानाथ पडोळे काँग्रेसला पुढे ठेवू शकले नाहीत. आजवर कधीही भाजप पुढे न राहिलेल्या नितीन राऊत यांच्या उत्तरमध्येही भाजपने १८ हजारावर आघाडी घेत झेंडा रोवला. पश्चिमची भाजपची लीड पाहता येथेही काँग्रेसच्या आशा मावळल्या आहेत. काँग्रेसचे ‘बुरे दिन’ येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)