शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

संजीवनी देणाऱ्या विदर्भावर काँग्रेसची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:14 IST

नागपूर : पडतीच्या काळात संजीवनी देणाऱ्या विदर्भावर पुन्हा एकदा काँग्रेसने फोकस केला आहे. महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी यवतमाळच्या संध्या सव्वालाखे ...

नागपूर : पडतीच्या काळात संजीवनी देणाऱ्या विदर्भावर पुन्हा एकदा काँग्रेसने फोकस केला आहे. महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी यवतमाळच्या संध्या सव्वालाखे यांची वर्णी लागल्यानंतर आता प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भाने ज्यावेळी काँग्रेसला भरीव साथ दिली त्याच वेळी काँग्रेसला राज्याच्या सत्तेची चाबी मिळाली. ही बाब हेरून काँग्रेस श्रेष्ठींनी विदर्भातून भविष्यातील सत्तेचा मार्ग सुकर करण्याची रणनीती आखली आहे.

यापूर्वी आबासाहेब खेडकर, नाशिकराव तिरपुडे, रणजित देशमुख, प्रभा राव, माणिकराव ठाकरे या विदर्भातील नेत्यांनी प्रदेश काँग्रेसचे यशस्वीपणे नेतृत्व केले. त्याचा फायदाही काँग्रेसला वेळोवेळी झाला. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांनाही विदर्भानेच साथ दिली होती. २०१४ मध्ये विदर्भातून काँग्रेसला ६२ पैकी फक्त १० जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली. मात्र, २०१९ मध्ये त्यात काहीशी वाढ झाली व १६ जागा निवडून आल्याने काँग्रेसचे संख्याबळ वाढले. एवढेच नव्हे तर गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातून काँग्रेसचे एकमेव खा. बाळू धानोरकर हे चंद्रपूर लोकसभेतून विजयी झाले. यावेळीही विदर्भानेच काँग्रेसची लाज राखली. पटोले यांच्या नियुक्तीने काँग्रेसला संकटात पाठबळ देणाऱ्या विदर्भाचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेेत आला आहे.

फडणवीसांना रोखण्यासाठी रणनीती

- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील भाजपचा मुख्य चेहरा आहेत. फडणवीसांची राज्यभरातील घोडदौड थांबवायची असेल तर त्यांना अधिकवेळ विदर्भात गुंतवून ठेवणे आवश्यक आहे. विदर्भाला झुकते माप देण्यामागे काँग्रेसची हीदेखील रणनीती आहे.

विदर्भातूनच सत्तेचा मार्ग

- विदर्भात विधानसभेच्या ६२ जागा आहेत. पैकी ३५ ते ४० जागा जिंकल्या तरच इतर विभागांच्या पुरवठ्याने काँग्रेस ८० पर्यंत मजल मारू शकते, असा काँग्रेसमधील धुरिणांचा अंदाज आहे. शिवाय राज्याच्या इतर भागात काँग्रेसला तिहेरी व चौरंगी लढतीला सामोरे जावे लागते. विदर्भात मात्र बहुतांश जागी थेट भाजपशीच सामना आहे. त्यामुळे ‘वन टू वन’ची लढाई असलेल्या विदर्भावर अधिक लक्ष केंद्रित करणे काँग्रेसचा जास्त फायद्याचे वाटत आहे.