शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस,राष्ट्रवादीचा वेगळ्या विदर्भाला ‘खो’

By admin | Updated: October 5, 2014 00:56 IST

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वेगळ्या विदर्भाचा मुद्दादेखील तापताना दिसून येत आहे. राजकीय पक्षांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर भर द्यावा, असे आवाहन विदर्भवादी संघटनांकडून करण्यात आले होते.

नागपूर : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वेगळ्या विदर्भाचा मुद्दादेखील तापताना दिसून येत आहे. राजकीय पक्षांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर भर द्यावा, असे आवाहन विदर्भवादी संघटनांकडून करण्यात आले होते. परंतु काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीचा कुठेच उल्लेख न झाल्यामुळे विदर्भवादी नाराज झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर भाजपाची भूमिका काय राहणार, याकडे लक्ष लागले आहे.जर बहुसंख्य नागरिकांची भावना असेल तर वेगळा विदर्भ व्हायला हवा, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही महिन्यांअगोदर केले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात वेगळ्या विदर्भासंदर्भात कुठेही उल्लेख केलेला नाही. वेगळ्या विदर्भाचा निर्णय नेत्यांनी नव्हे जनतेने घ्यायचा आहे. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर ज्यांनी निवडणुका लढविल्या ते अयशस्वी झाले, असे मत जाहीरनामा घोषित झाल्यानंतर व्यक्त करून पवारांनी वेगळ्या विदर्भाला विरोध असल्याचे अप्रत्यक्षरीत्या सुचित केले. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात सुरुवातीलाच एकसंघ महाराष्ट्राचा निर्धार करण्यात आला आहे. जाहीरनाम्यात नागपूरच्या विकासासाठी ‘मोनोरेल’ आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे. शिवाय राज्यातील इतर विभागांसोबतच विदर्भात उद्योग आणण्यासाठी स्वतंत्र धोरण आखण्यात येईल, असे आश्वासनदेखील देण्यात आले आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षानेदेखील वेगळ्या विदर्भाला जाहीरनाम्यात स्थान दिलेले नाही. ‘विकासाच्या वाटेवर’ असा दावा करणाऱ्या जाहीरनाम्यात वेगळ्या विदर्भ निर्मितीच्या मार्गाचा उल्लेखच नाही. विदर्भाच्या विकासासाठी काँग्रेसने विदर्भ वैधानिक विकास मंडळाला आणखी सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिवाय नागपूर येथे कृषी निर्यात हब स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे वेगळ्या विदर्भासंदर्भात सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या एका नेत्याने पक्षश्रेष्ठींकडे केली होती. परंतु वेगळ्या विदर्भाला काँग्रेसने नकारच दिला आहे.तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाने जोर धरला आहे. अगदी स्थानिक स्तरापासून ते इंटरनेटच्या ‘ग्लोबल’ चावडीपर्यंत ही मोहीम जोर धरते आहे. विधानसभा निवडणुकांदरम्यान विदर्भ हाच प्रचाराचा मुद्दा असला पाहिजे, अशी ठोस भूमिका विदर्भवादी संघटनांनी घेतली आहे. विदर्भ विरोधक पक्ष व नेत्यांना विदर्भवादी जनता व कार्यकर्ते सळो की पळो करून सोडतील, असा इशाराच त्यांच्याकडून देण्यात आला होता. परंतु मोठ्या पक्षांनी वेगळ्या विदर्भाला जाहीरनाम्यात स्थानच न दिल्याने विदर्भवाद्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. निवडणुकांत विदर्भवाद्यांची नेमकी भूमिका काय राहणार यावर अनेक ठिकाणी मतांचे राजकारण अवलंबून राहणार आहे.(प्रतिनिधी)