अर्णबच्या अटकेसाठी काँग्रेस आक्रमक ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:08 IST2021-01-23T04:08:13+5:302021-01-23T04:08:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील सोशल मीडियावरील संवाद अतिशय ...

Congress aggressive for Arnab's arrest () | अर्णबच्या अटकेसाठी काँग्रेस आक्रमक ()

अर्णबच्या अटकेसाठी काँग्रेस आक्रमक ()

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील सोशल मीडियावरील संवाद अतिशय गंभीर आहेत. भारतीय जवानांवरील हल्ला व देशाच्या सुरक्षेशी संबंधित हा प्रश्न असून या प्रकरणी अर्णबला तातडीने अटक करून याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने लावून धरली आहे. या मागणीसाठी काँग्रेसतर्फे देशभरात आंदोलने सुरू असून शुक्रवारी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली.

प्रदेश काँग्रेसचे सचिव विशाल मुत्तेमवार व डॉ. गजराज हटेवार यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान भाजप व केंद्र सरकारविरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. आंदोलनात प्रदेश काँग्रेसचे सचिव गिरीश पांडव, प्रशांत धवड, बंडोपंत टेभुर्णे, डॉ. मनोहर तांबुलकर, वीणा बेलगे, नगरसेवक संदीप सहारे, स्नेहा विवेक निकोसे, सेवादल अध्यक्ष प्रवीण आगरे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष इरशाद अली, ज्ञानेश्वर ठाकरे, दिनेश तराळे, गोपाल पट्टम, विश्वेश्वर अहीरकर, प्रवीण गवरे, अब्दुल शकील, सुनीता ढोले, सूरज आवळे, इरशाद मलिक, राजेश पौनीकर, युवराज वैद्य, देवेंद्र रोटेले, प्रमोद ठाकूर, पंकज थोरात, अशोक निखाडे, श्रीकांत ढोलके, जॉन थॉमस, पिंटू तिवारी, आनंद तिवारी आदी सहभागी झाले होते.

Web Title: Congress aggressive for Arnab's arrest ()