शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

आपापसात भांडण करणे हाच काँग्रेसचा अजेंडा

By admin | Updated: February 16, 2017 22:55 IST

काँग्रेस पक्षाला देशभरातून जनतेने नाकारल्यानंतरदेखील पक्षनेत्यांमध्ये वर्चस्वासाठी चढाओढ सुरू आहे. आपापसांत भांडण करणे हाच

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 16 -  काँग्रेस पक्षाला देशभरातून जनतेने नाकारल्यानंतरदेखील पक्षनेत्यांमध्ये वर्चस्वासाठी चढाओढ सुरू आहे. आपापसांत भांडण करणे हाच काँग्रेसचा मुख्य ह्यअजेंडाह्ण आहे. एखाद्या दिवाळखोरीत निघालेल्या बँकेसारखी काँग्रेस पक्षाची अवस्था झाली आहे, या शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. एकात्मता नगर, जयताळा व सुभाषनगर येथे आयोजित प्रचारसभांमध्ये त्यांनी गुरुवारी वरील वक्तव्य केले.यावेळी मंचावर माजी खासदार दत्ता मेघे, बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे, आ. अनिल सोले प्रामुख्याने उपस्थित होते. काँग्रेसचे शासन असतानादेखील नेत्यांमधील भांडणाव्यतिरिक्त काहीही झाले नाही. काँग्रेसमधील मुत्तेमवार गट व चतुर्वेदी-राऊत गटाच्या भांडणात नागपूरचे प्रचंड नुकसान झाले. सत्ता नसतानादेखील हे नेते आपापसातीलच भांडणात व्यस्त आहे. लोकांच्या जमिनी हडप करणे हीच कॉंग्रेसची प्रवृत्ती आहे, अशी बोचरी टीका फडणवीस यांनी केली. मिहान प्रकल्पग्रस्तांना हक्काचे मालकीपट्टे देण्यासंदर्भात आम्ही प्रयत्नरत आहोत. जमिनीची मोजणी करायची होती. मात्र काही लोकांच्या पोटात दुखते आहे. जनतेसाठी काय काम केले, याचे ५ वर्षे पूर्ण झाल्यावर ह्यरिपोर्टकार्डह्णच सादर करू, असे ते म्हणाले....तर चेहरा दाखविणार नाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपुरचा वेगाने विकास होत आहे. २०१९ पर्यंत नागपूरला देशातील ह्यमॉडेलह्ण शहर बनवायचे आहे. जर असे झाले नाही तर मी चेहरादेखील दाखविणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. जे बोलतो ते करतो, सेनेला चिमटायावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली. जगातील श्रीमंत शहरांपैकी मुंबई एक शहर आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प ३७ हजार कोटींचा आहे. मात्र असे असतानादेखील तेथील १ थेंब सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. सगळे सांडपाणी समुद्रात जाते. नागपुरात नेमकी विरुद्ध स्थिती आहे, असे म्हणत त्यांनी ह्यबीएमसीह्णच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवले. मी जे बोलतो ते करून दाखवतो आणि माझे शब्द ही काळ्या दगडावरील रेघच असते, असे सूचक वक्तव्यदेखील त्यांनी यावेळी केले.