शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द पुनर्वसित क्षेत्रातील कामे पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:34 IST

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाअंतर्गत येणाºया गावांचे पुनर्वसन करण्यात आलेल्या ठिकाणी नागरी सुविधांच्या कामासोबत येथील नागरिकांच्या मागणीनुसार रस्ते,....

ठळक मुद्देजिल्हाधिकारी सचिन कुर्वे : १२ पुनर्वसित गावांची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाअंतर्गत येणाºया गावांचे पुनर्वसन करण्यात आलेल्या ठिकाणी नागरी सुविधांच्या कामासोबत येथील नागरिकांच्या मागणीनुसार रस्ते, पाणी, वीज आदी सुविधा तात्काळ पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सोमवारी पुनर्वसन झालेल्या गावातील नागरी सुविधांच्या कामांची पाहणी केल्यानंतर अधिकाºयांना दिल्या.गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या पचखेडी, केसोरी, सोनपुरी, बोथली, आंभोरा-अडेगाव येथील पुनर्वसन कामांची पाहणी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केली. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने विविध यंत्रणांच्या अधिकाºयांना सूचना दिल्या आहेत. गोसेखुर्द प्रकल्पाच्या कुही तालुक्यातील १५ गावांचे पुनर्वसन पाच ठिकाणी करण्यात आले आहे. यामध्ये १ हजार ७७५ कुटुंब स्थलांतरित झाले असून त्यांना २ हजार ०२३ भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच भूखंडाचा मोबदला म्हणून १५ कोटी ५६ लक्ष रुपये वितरित करण्यात आले असून पॅकेजअंतर्गत ४२ कोटी ४३ लाख आणि वाढीव ४६४ कुटुंबांना १३ कोटी ४५ लक्ष रुपयाचे वाटप पूर्ण झाले आहे. कुही तालुक्यातील १५ गावांचे पाच ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले असून, नागरी सुविधांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामाअंतर्गत महावितरण कंपनी, जिल्हा परिषद बांधकाम, तसेच पाणीपुरवठा विभागाद्वारे नियोजित करण्यात आलेली सर्व नागरी सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत. येथील नागरिकांच्या मागणीनुसार यंत्रणांनी दखल घेऊन तात्काळ प्रश्न सोडवावेत अशी सूचना करताना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे म्हणाले की, महावितरण कंपनीने मागणीनुसार थ्रीफेज कनेक्शन, १६ सप्टेंबर पर्यंत पाणी पुरवठ्याची कामे व ३१ आॅक्टोबरपर्यंत नागरी सुविधांची कामे पूर्ण करावीत अशी सूचना यावेळी केली. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पचखेडी एक व दोन येथे पुनर्वसित झालेल्या कुकुडउमरी, सोनेगाव, जिवतापूर, केसोरी येथे पुनर्वसित झालेल्या पवनी, मसली, सिर्सी, बोथली येथे नवेगाव सिर्सी, उमरी, पिंपरीमुंजे, धामणी, गोंडपिंपरी, आंभोरा-अडेगाव येथे आंभोरा कला, अंभोरा खुर्द, मालोदा, गडपायली येथील नागरिकांना भेटून नागरी सुविधांची पाहणी केली व त्यांच्या समस्या ऐकून त्याचे निराकरण केले. पुनर्वसित ठिकाणी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा तसेच वीज वितरण कंपनीतर्फे सुरू असलेल्या नागरी सुविधांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली.