Complaint lodged with police against Arnab Goswami | अर्णब गोस्वामींविरुद्ध पोलिसांकडे तक्रार

अर्णब गोस्वामींविरुद्ध पोलिसांकडे तक्रार

नागपूर : पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध अपमानजनक भाषेचा वापर करून सरकार पाडण्याची धमकी दिल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे फॅन्स क्लबतर्फे निषेध नोंदविण्यात आला.

अर्णब गोस्वामी यांना अटक करून त्यांच्या चॅनलविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी तक्रारही कळमना पोलिसांकडे करण्यात आली. उद्धव ठाकरे फॅन्स क्लबचे रवनीश पांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रिपब्लिकन भारत या चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपमानजनक भाषेचा वापर केला.

Web Title: Complaint lodged with police against Arnab Goswami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.