शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहितेची सासरच्यांविरुद्ध तक्रार

By admin | Updated: October 23, 2016 02:43 IST

सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका महिलेने पतीविरुद्ध अनैसर्गिक अत्याचाराचा आणि सासरच्या मंडळीविरुद्ध छळाचा आरोप करून पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

पतीविरुद्ध बलात्काराचा आरोप : गणेशपेठमध्ये गुन्हा दाखलनागपूर : सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका महिलेने पतीविरुद्ध अनैसर्गिक अत्याचाराचा आणि सासरच्या मंडळीविरुद्ध छळाचा आरोप करून पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.पीडित महिला (वय २३) परतवाडा येथील रहिवासी आहे. तिचे गणेशपेठेतील विश्वदीप जगदेव मनोहर (वय २८) याच्याशी एप्रिल २०१६मध्ये लग्न झाले. तो महापालिकेत काम करतो. लग्नाच्या काही दिवसानंतर विविध कारणावरून तिचे पती आणि सासरच्या मंडळीसोबत खटके उडू लागले. जूनमध्ये ती माहेरी गेली. त्यावेळी तिने तिकडच्या पोलिसांकडे तक्रार नोंदवली. नुकतेच लग्न झाल्यामुळे पोलिसांनी तिची समजूत काढून पतीकडे नांदण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ती सासरी परतली. त्यानंतर परत नवरा आणि सासरच्या मंडळीसोबत महिलेचे खटके उडू लागले. १७ जूनला ती माहेरी निघून गेली. शुक्रवारी ती माहेरच्या मंडळीसोबत गणेशपेठ ठाण्यात आली. ठाणेदार महेश चव्हाण यांची भेट घेऊन तिने तक्रार दिली. तक्रारीत गंभीर आरोप आहेत. पीडित महिलेला तिचा पती अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी छळत होता. त्याची सासरच्या मंडळीकडे तक्रार केली असता सासू सासरेही तिला शिवीगाळ करीत होते. माहेरहून पैसे आणि सोने आणावे म्हणून त्रास देत होते. तिची नणंद वर्धा येथे राहते. ती पीडित महिलेवर मांसाहार करण्यासाठी दबाव टाकत होती. दीर वाईट नजर टाकून मारहाण करीत होता, असे आरोप पीडित महिलेने पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीत लावले. त्यावरून पोलिसांनी विश्वदीप जगदेव मनोहर, जगदेव पांडुरंग मनोहर (वय ५६), ज्योती जगदेव मनोहर (वय ४८), गोविंद जगदेव मनोहर (वय २३) आणि उज्ज्वला राजेन्द्र मनोहर (वय ४०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)दुसरी बाजू अंधारात या प्रकरणाची दुसरी बाजू काय आहे, ते जाणून घेण्यासाठी गणेशपेठ ठाण्यात चौकशी केली असता पोलिसांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले. आरोपांची गंभीरता लक्षात घेता या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असल्याचे ठाणेदार चव्हाण म्हणाले.