शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन विद्यार्थी करणार जागर

By admin | Updated: October 9, 2014 00:54 IST

मतदार यादीत नाव असलेल्या जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी जनजागृती करणार आहेत. त्यासाठी गुरुवारी ९ तारखेला संविधान चौकातून रॅली काढण्यात येत

मतदार जागृतीनिमित्त आज रॅली : १५०० विद्यार्थ्यांचा सहभागनागपूर: मतदार यादीत नाव असलेल्या जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी जनजागृती करणार आहेत. त्यासाठी गुरुवारी ९ तारखेला संविधान चौकातून रॅली काढण्यात येत असून त्यात १५०० विद्यार्थी सहभागी होतील.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्यात मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात जिल्हा निवडणूक शाखा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान चौकाजवळील विद्यमाने वसंतराव नाईक कला व समाज विज्ञान संस्था येथून विद्यार्थ्यांची रॅली निघेल.व्हेरायटी चौक, महाराजबाग रोड, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ चौक, शासकीय मुद्रणालय आणि संविधान चौक या मार्गाने ही रॅली जाईल. यात विविध महाविद्यालयातील रासेयोचे सरासरी १५०० विद्यार्थी सहभागी होतील. मतदार जागृती अभियानासाठी नियुक्त करण्यात आलेली ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अरुंधती पानतावने हिच्यासह ‘स्वीप’चे निरीक्षक विजयकुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अजय रामटेके, उपजिल्हाधिकारी गिरीश जोशी, प्रमोद भुसारी, रासेयोचे समन्वयक डॉ. भाऊ दायदार हे रॅलीत सहभागी होतील व नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन करतील. (प्रतिनिधी)