शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

CM देवेंद्र फडणवीसांनी पदवीधर मतदार यादीसाठी भरला अर्ज; आता पदाधिकाऱ्यांसमोर नोंदणीचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 22:11 IST

मुख्यमंत्र्यांनी पदवीधर नोंदणीसंदर्भात मागील आठवड्यात झालेल्या भाजपच्या विदर्भस्तरीय बैठकीत सूचना केल्या होत्या

योगेश पांडे नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडून पुढील वर्षी होणाऱ्या विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीदेखील तयारी सुरू झाली आहे. भाजपने मतदारसंघात सात लाखांच्या नोंदणीचे टार्गेट ठरविले आहे. अनेक कार्यकर्त्यांनी अद्यापही ही मोहीम गंभीरतेने घेतलेली नाही. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अगोदर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नोंदणीचा अर्ज भरल्याने आता या मोहिमेची गती वाढविण्याचे आव्हान पदाधिकाऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.

दिवाळीनंतर केवळ यावरच लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील निवडणुकीतील पराभवाचे शल्य नेत्यांना बोचत असून, वरिष्ठ पातळीवरूनदेखील याची तयारी करण्याचे निर्देश आले होते. त्याअंतर्गत माजी आमदार सुधाकर कोहळे यांची मतदार नोंदणी प्रमुख, तर सुधीर दिवे यांची मतदार नोंदणी सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोहळे यांनी सात लाख मतदारांच्या नोंदणीचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उमेदवारीसाठी इच्छुकांना जास्तीत जास्त मतदारांचे अर्ज भरून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, असे उमेदवार वगळता काही जणांनी ही मोहीम गंभीरतेने घेतली नव्हती.

मुख्यमंत्र्यांनी पदवीधर नोंदणीसंदर्भात मागील आठवड्यात झालेल्या भाजपच्या विदर्भस्तरीय बैठकीत सूचना केल्या होत्या. नागपुरात आल्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वत: यासाठी अर्ज भरून दिला आहे. यावेळी सुधाकर कोहळे, सुधीर दिवे, नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, गिरीश देशमुख, श्रीकांत आगलावे, माजी नगरसेवक नरेंद्र बोरकर, विष्णू चांगदे, रितेश गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व पदवीधरांपर्यंत पोहोचून अर्ज भरण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. तसेच तरुणाईवर लक्ष केंद्रित करण्यात यावे, अशी सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : CM Fadnavis applies for graduate voter list; registration challenge ahead.

Web Summary : With local elections looming, BJP prepares for graduate constituency elections. CM Fadnavis and Nitin Gadkari completed voter registration, urging officials to accelerate the drive, targeting seven lakh registrations, especially focusing on youth after past setbacks.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा