शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर दंगलीतून शिंदेंकडून तुमची कोंडी?; आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांचा संताप, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 15:54 IST

आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेत हे वक्तव्य मूर्खपणाचं असल्याचं म्हटलं आहे.

CM Devendra Fadnavis: नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान गंभीर आरोप केला होता. मुख्यमंत्र्‍यांना अडचणीत आणण्यासाठी सरकारमधील एक उपमुख्यमंत्रीच हे घडवून आणत असतील, असा दावा ठाकरे यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेत हे वक्तव्य मूर्खपणाचं असल्याचं म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याविषयी नागपुरातील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "असं वक्तव्य करणं हा मूर्खपणा आहे. काही लोकं अशा घटनांमध्येही राजकारण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्या वक्तव्याला काहीही अर्थ नाही. घटना गंभीर आहे, या घटनेला कोणताही राजकीय अँगल नाही. या घटनेला कारणीभूत असणाऱ्या लोकांना कठोर शासन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही," अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे. 

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

नागपूर हिंसाचाराबद्दल बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं की, "ज्या शहराबद्दल आपण बोलतोय, त्या नागपूरमधून राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री येतात. जेव्हा पेटवा पेटवी होत होती, तेव्हा पोलीस उशिराने आले असं तिथले स्थानिक बोलत आहेत. जेव्हा अशा घटना घडतात, ठिणगी पडते तेव्हा त्याचे इंटेलिजेंस रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडे येणे गरजेचे असते. महाराष्ट्रात सरकार बनल्यानंतर बीड असेल, परभणी असेल बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. त्यात कधीतरी फोटो लीक होतात. माध्यमात काही गोष्टी येतात. कदाचित जे पेटवा पेटवी करत आहेत, त्यात मंत्रिमंडळातील काही लोक असतील. मुख्यमंत्र्यांनंतर एक उपमुख्यमंत्री भाषण करतात. आपण किती मोठे आहोत, आपलं वाचन आहे हे दाखवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनंतर ते बोलले. सरकारमध्ये कुणीतरी असं आहे जे मुख्यमंत्र्यांना जुमानत नाही, हे लोकांसमोर आले पाहिजे. सरकारमध्ये सर्व काही ठीक आहे असं नाही. काही तरी गडबड आहे. एकमेकांवर बऱ्याचदा टीकाटिप्पणी करत असतात. त्यामुळे त्यांच्या युतीमधीलच कुणी फडणवीसांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय का, याचा विचार केला पाहिजे," असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला होता.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाnagpurनागपूर