शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मिरची महाग, भाज्या स्वस्त

By admin | Updated: May 18, 2015 02:40 IST

मध्यंतरी पावसामुळे भाज्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून पीकही चांगले आले आहे.

नागपूर : मध्यंतरी पावसामुळे भाज्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून पीकही चांगले आले आहे. परिणामी स्थानिक उत्पादकांकडून आवक वाढली आहे. भाव गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात आहेत. गृहिणींना आवडीच्या भाज्या सहज उपलब्ध होत आहेत. स्थानिक उत्पादकांकडील हिरवी मिरची संपली आहे. बाहेरून माल येत असल्यामुळे मिरची महाग आहे. रविवारी कॉटन मार्केट बाजारात प्रति किलो भाव ३५ ते ४० रुपये होते, तर स्थानिक बाजारात ५० रुपये किलो विक्री झाली. सांभार २५ रुपये किलो भाव होते. याशिवाय वांगी, फुलकोबी, पत्ताकोबी, भेंडी, शेंगा, तोंडले, परवळ स्वस्त असल्याने ग्राहकांकडून मागणी आहे. कॉटन मार्केटमध्ये दररोज १५० ते १७५ लहानमोठ्या गाड्यांची आवक असून उन्हाळ्यात भाज्या आटोक्यात राहतील, अशी प्रतिक्रिया कॉटन मार्केट आडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली. कांदे महाग, बटाटे स्वस्तयावर्षी पावसामुळे पीक खराब झाल्याने उत्पादन कमी आहे. गेल्या काही दिवसांत कांदे महाग झाले आहेत. कळमना ठोक बाजारात लाल आणि पांढरे कांदे ५०० ते ५५० रुपयांवर (४० किलो) गेले असून किरकोळमध्ये भाव प्रति किलो २० रुपये आहेत. गेल्यावर्षी याच काळात कांदे ३०० ते ३५० रुपये होते. भाव वाढून प्रति किलो प्रति किलो ३० रुपयांवर गेले होते. यंदा पांढरा कांदा आणखी महाग होईल, अशी प्रतिक्रिया कळमना येथील आलू कांदे असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतशी बोलताना दिली. सध्या अमरावती आणि अकोला जिल्ह्यातून पांढरे कांदे तर बुलडाणा आणि नाशिक जिल्ह्यातून लाल कांद्याची आवक आहे. गुजरात आणि धुळे जिल्ह्यात काद्यांचे पीक फारच कमी आहे. सध्या सरासरी २० मोठ्या ट्रकची आवक आहे. यंदा बटाट्याचे विक्रमी पीक झाल्याने भाव फारच कमी आहेत. कळमन्यात दर्जानुसार ३०० ते ४०० रुपये भाव आहेत. किरकोळमध्ये चांगल्या दर्जाचे बटाटे प्रति किलो १२ ते १५ रुपयांदरम्यान आहेत. सरासरी १६ ते २० ट्रकची आवक कानपूर, आग्रा आणि अहमदाबाद येथून माल येत आहे. पुढे आवक वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी बटाट्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आणि पीकही चांगले आले. यंदा गुजरात आणि पश्चिम बंगाल येथेही बटाट्याचे पीक जास्त आले आहे. शीतगृहातही माल पडून आहे. त्यामुळे यंदा भाववाढीची शक्यता नाही, असे वसानी म्हणाले. (प्रतिनिधी)