कारच्या धडकेत बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:08 IST2021-03-21T04:08:28+5:302021-03-21T04:08:28+5:30

खापरखेडा : भरधाव कारने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीवरील बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुचाकी ...

Child killed in car crash | कारच्या धडकेत बालकाचा मृत्यू

कारच्या धडकेत बालकाचा मृत्यू

खापरखेडा : भरधाव कारने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीवरील बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुचाकी चालक जखमी झाला. ही घटना खापरखेडा पाेलीस ठाण्यांतर्गतच्या चनकापूर येथे गुरुवारी (दि.१८) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.

साैरभ परतेती (४) असे मृत बालकाचे नाव असून, पृथ्वीराज काेहवते असे जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे. पृथ्वीराज हा त्याचा भाचा साैरभल खाऊ घेण्यासाठी दुचाकीने जात हाेता. दरम्यान, खापरखेडाकडून दहेगाव (रंगारी)कडे जाणाऱ्या एमएच-३१/एफए-७९१४ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या क्रेटा कारने त्यांच्या दुचाकीला जाेरदार धडक दिली. त्यात दुचाकीवर मागे बसलेला साैरभला गंभीररीत्या दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जखमी दुचाकीचालक पृथ्वीराजला नागपुरातील मेयाे हाॅस्पिटलमध्ये भरती केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी आराेपी कार चालक कनिष्कराज विमनसूर्य चिमनकर (२६, रा.जुना फुटाळा, नागपूर) याच्याविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, त्यास अटक केली आहे. पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक मनाेज मेश्राम करीत आहेत.

Web Title: Child killed in car crash