शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यासमोरच घेतला ‘चेतक’ने पेट

By admin | Updated: February 16, 2017 02:21 IST

इमामवाडा पोलीस ठाण्याच्या समोर पोलिसांच्या ‘चेतक’ वाहनाने पेट घेऊन ते आगीत खाक झाले. बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे शहर पोलिसात खळबळ उडाली आहे.

नागपूर : इमामवाडा पोलीस ठाण्याच्या समोर पोलिसांच्या ‘चेतक’ वाहनाने पेट घेऊन ते आगीत खाक झाले. बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे शहर पोलिसात खळबळ उडाली आहे. आगीचे नेमके कारण कळले नाही. इमामवाडा ठाण्याचे चेतन वाहन क्रमांक एम. एच. ३१, डी. झेड-०४९८ चालक नसल्यामुळे मंगळवारी रात्री ९ वाजता ठाण्यासमोर उभे केले होते. दिवसपाळीत तैनात चालक रात्री ९ वाजता वाहनाला लॉक करून चावी सोपवून निघून गेला. पहाटे ३.४५ वाजताच्या दरम्यान हवालदार दिलीपला चेतक वाहन जळत असल्याचे दिसले. त्याने बाहेर येऊन पाहिले असता आगीचा डोंब दिसला. त्याने त्वरित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तसेच नियंत्रण कक्ष आणि अग्निशमन विभागाला सूचना दिली. अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी पोहोचला. अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. परंतु तोपर्यंत वाहन जळून खाक झाले होते. त्यातील वायरलेस सेटही नष्ट झाला. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. जाणकारांच्या मते कुणीतरी खोडसाळपणा केल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी शॉट सर्किटमुळे आग लागल्याची शंका व्यक्त केली आहे. परंतु शॉट सर्किटमुळे इतकी मोठी आग लागत नसल्याचे बोलल्या जात आहे. इमामवाडा परिसरात गुन्हेगारी अधिक आहे. अशा स्थितीत पोलिसांचे वाहन आपात्कालीन स्थितीत कार्यरत असतात. वाहनांच्या देखभालीसाठी मोटार वाहन विभाग कार्यरत आहे. वेळोवेळी वाहनांची तपासणी करण्यात येते. परंतु इमामवाडा पोलिसांनी यात खोडसाळपणा झाल्याचे अमान्य केले आहे. (प्रतिनिधी) तर अनर्थ झाला असता चालकाच्या अभावी वाहन ठाण्यासमोर ठेवण्यात आले होते. चालक असता तर मंगळवारी रात्री हे वाहन गस्त घालण्यासाठी बाहेर काढले असते. गस्त घालत असताना ही घटना घडली असती तर अनर्थ घडला असता.