शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

एका ‘क्लिक’वर भरता येणार शुल्क

By admin | Updated: January 15, 2016 03:30 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांना रांगेमध्ये ताटकळत उभे राहावे लागते.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांना रांगेमध्ये ताटकळत उभे राहावे लागते. परंतु आता मात्र केवळ एका ‘क्लिक’वर हे शुल्क भरता येणार आहे. नागपूर विद्यापीठातील आर्थिक व्यवहार ‘आॅनलाईन’ करण्यासाठी ‘ई’ सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात गुरुवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या तातडीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.नागपूर विद्यापीठाच्या आर्थिक कारभारात एकसूत्रता आणण्यात यावी, अशी काही काळापासून मागणी होत आहे. विविध शुल्कांसाठी विद्यापीठाच्या ‘काऊंटर’वर पैसे भरणे हे एखाद्या शिक्षेप्रमाणेच असते. लांबलचक रांग आणि कर्मचाऱ्यांची आडमुठेपणाची वागणूक यामुळे विद्यार्थी हैराण होतात. शिवाय महाविद्यालयांनादेखील विविध शुल्क भरणे सोयीचे व्हावे यासाठी ‘ई’ सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी विद्यापीठाने पाच बँकांसोबत चर्चादेखील केली आहे. १ एप्रिलपासून ही सेवा सुरू करण्यात येईल. विद्यार्थी ‘नेट बँकिंग’ किंवा ‘डेबिट’, ‘क्रेडिट कार्ड’च्या साहाय्याने शुल्क भरू शकणार आहेत.(प्रतिनिधी)