प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती कायद्यानुसार

By Admin | Updated: September 18, 2014 00:45 IST2014-09-18T00:45:16+5:302014-09-18T00:45:16+5:30

कुलपतींनी आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी

In charge of the appointment of Chancellor in charge | प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती कायद्यानुसार

प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती कायद्यानुसार

कुलपतींचे प्रतिज्ञापत्र : हायकोर्टात गुरुवारी सुनावणी
नागपूर : कुलपतींनी आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी कायद्यानुसारच नियुक्ती करण्यात आल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात पात्र व्यक्तीची नव्हे, तर अनुकूल व्यक्तीची प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती करावी, अशी तरतूद असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. या प्रकरणावर उद्या, गुरुवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे.
यासंदर्भात सिनेट सदस्य गुरुदास कांबडी यांनी रिट याचिका दाखल केली आहे. प्रा. सुनील मिश्रा यांचा मध्यस्थी अर्ज आहे. गेल्या तारखेला न्यायालयाने पात्र कुलगुरूची नियुक्ती करण्याचे मौखिक निर्देश देऊन सर्व पक्षकारांना उत्तर सादर करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ दिला होता. विद्यापीठात लवकरात लवकर कुलगुरूची नियुक्ती करण्यात यावी व कुलगुरूपदी पात्र व्यक्तीची निवड करण्याचा अधिकार, कुलपतींना देणाऱ्या कलमाचा अन्वयार्थ लावण्यात यावा, अशी याचिकाकर्त्याची विनंती आहे. डॉ. विलास सपकाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर कुलपतींनी गेल्या ३० मार्चच्या आदेशान्वये विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे कुलगुरूचा अतिरिक्त पदभार सोपविला. कुलगुरू विद्यापीठाच्या सर्व वैधानिक मंडळे व निवड समितीचे प्रमुख असतात. यामुळे अशा पदांवर विद्वान व्यक्तीचीच नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In charge of the appointment of Chancellor in charge