शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

इन्फ्राटेक रियल इस्टेटला चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST

नागपूर : शेकडो ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या इन्फ्राटेक रियल इस्टेट कंपनीला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात जोरदार चपराक बसली. ...

नागपूर : शेकडो ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या इन्फ्राटेक रियल इस्टेट कंपनीला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात जोरदार चपराक बसली. मंचने एका तक्रारकर्त्या ग्राहकाचे ६ लाख २६ हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश कंपनीला दिला. तसेच, ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २५ हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार अशी एकूण ३५ हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कमही इन्फ्राटेक कंपनीनेच द्यायची आहे.

भूपेंद्र कापगते असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून, ते सेंदूरवाफा, ता. साकोली, जि. भंडारा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या तक्रारीवर पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सहा लाख २६ हजारापैकी ३ लाख १३ हजार रुपयावर ३ डिसेंबर २००९ तर, उर्वरित ३ लाख १३ हजार रुपयावर ३ जानेवारी २०११ पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत व्याज लागू करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर रोज ५० रुपये दंड लागू होईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

कापगते यांनी कंपनीच्या मौजा पिपरी, ता. कुही येथील ‘मार्वेल’ योजनेतील विला १५ लाख ६५ हजार ३९५ रुपयात खरेदी केली आहे. त्यानंतर त्यांनी कंपनीला दोन टप्प्यात एकूण ६ लाख २६ हजार रुपये अदा केले. परंतु, कंपनीने संबंधित जमिनीवर काहीच बांधकाम केले नाही. तसेच, कापगते यांना विलाचा ताबा दिला नाही. कंपनीने विक्रीपत्र करून देण्यासही टाळाटाळ केली. शेवटी कापगते यांनी ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल करून न्याय मागितला. त्यानंतर कंपनीने मंचची नोटीसही स्वीकारली नाही. परिणामी, तक्रारीवर एकतर्फी कारवाई करून हा निर्णय देण्यात आला.

-------------

अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब

कंपनीला प्रकल्प पूर्ण करण्यासंदर्भात काही अडचणी होत्या तर, त्यासंदर्भात तक्रारकर्त्याला कळवून त्यांची रक्‍कम व्‍याजासह परत करणे आवश्‍यक होते. परंतु, कंपनीने तसे केले नाही. कंपनी तक्रारकर्त्याकडून स्वीकारलेल्या रकमेचा आजतागायत उपयोग करीत आहे. सदर कृती ही सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब दर्शविते, असे मत मंचने निर्णयात व्यक्त केले.