शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

काम न करणाऱ्यांना बदलणार

By admin | Updated: August 20, 2016 02:20 IST

काँग्रेसची शहर कार्यकारिणी गुरुवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी जाहीर केली.

काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीत अनेकांची संधी हुकली : नगरसेवकांचा समावेश नाही नागपूर : काँग्रेसची शहर कार्यकारिणी गुरुवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी जाहीर केली. मात्र, ही कार्यकारिणी कायम स्वरुपी नसेल. दर महिन्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. जे काम करणार नाही, पक्षाच्या बैठकींना, आंदोलनांना उपस्थित राहणार नाही, अशा पदाधिकाऱ्यांना बदलले जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी तसे निर्देश शहर अध्यक्षांना दिले आहेत. शहर कार्यकारिणीत विद्यमान नगरसेवकांना स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे काही नगरसेवकांनी दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर काही मतांनी पराभूत झालेल्या बऱ्याच उमेदवारांना पद देऊन आगामी निवडणुकीसाठी त्यांची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यकारिणीत आपल्याला संधी मिळेल, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, अनेकांची संधी हुकली. त्यांनी नेत्यांकडे आपली खंत व्यक्त केली. यापूर्वी कार्यकारिणीत असलेल्या काहींना डच्चूही देण्यात आला. त्यांनीही आपली नाराजी व्यक्त केली. मात्र, बहुतांश जुन्या पदाधिकाऱ्यांना कायम ठेवण्यात आले असून निष्क्रिय लोकांनाच बदलण्यात आले असल्याचे शहर काँग्रेसने स्पष्ट केले आहे. याबाबत शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, एकाही नगरसेवकाने आपल्याकडे नाराजी व्यक्त केलेली नाही. विद्यमान नगरसेवकांना महापालिकेची आगामी निवडणूक लढायची आहे. त्यांना तिकीट मिळणार असल्याने पक्षाचे पद दुसऱ्या कार्यकर्त्यांना देऊन पक्षाची व नगरसेवकांचीच ताकद वाढविण्यात आली आहे,असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पदे मर्यादित आहेत व कार्यकर्त्यांची फौज मोठी आहे. त्यामुले सर्वांनाच पद देणे शक्य झाले नाही. आता उरलेल्या सक्षम कार्यकर्त्यांना विविध सेल व आघाड्यांची जबाबदारी सोपविली जाईल. याशिवाय पक्षात पद देऊनही एखादा पदाधिकारी काम करण्यास इच्छुक नसेल, गटबाजीला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा पदाधिकाऱ्याबाबत पुनर्विचार केला जाईल, त्यांच्या जागी दुसऱ्या इच्छुक कार्यकर्त्याला संधी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) ‘त्या’ कार्यकर्त्याला का घेतले ? गटबाजी बाजूला सारून कार्यकारिणी तयार करण्यात आल्याचा दावा ठाकरे यांनी केला आहे. मात्र, निवडणुकीत आपल्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पदाधिकारी का बनविण्यात आले या मुद्यावर शहरातील काही ज्येष्ठ नेत्यांनी रान पेटविले आहे. इतिहास विसरून सर्वांना सोबत घेण्याची भू्मिका नेत्यांनी घेतली नाही तर नागपुरातील सहा- शून्य चा भाजपचा विक्रम भविष्यातही मोडता येणार नाही, हे विसरून चालणार नाही.