शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
3
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
4
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
5
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
6
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
7
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
8
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
9
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
10
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
11
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
12
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
13
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
14
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
15
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
16
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
17
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
18
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
19
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
20
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाच्या रोस्टरमध्ये बदल

By admin | Updated: May 26, 2014 01:01 IST

मुंबई उच्च न्यायालयासह संलग्नित तिन्ही खंडपीठातील न्यायमूर्ती व त्यांच्या जबाबदार्‍यांमध्ये नियमित प्रक्रियेंतर्गत फेरबदल करण्यात आला आहे. उन्हाळी सुट्या संपल्यानंतर म्हणजेच येत्या

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयासह संलग्नित तिन्ही खंडपीठातील न्यायमूर्ती व त्यांच्या जबाबदार्‍यांमध्ये नियमित प्रक्रियेंतर्गत फेरबदल करण्यात आला आहे. उन्हाळी सुट्या संपल्यानंतर म्हणजेच येत्या ९ जूनपासून नवीन बदल लागू होणार आहे.

नागपूर खंडपीठात न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांच्याकडे सर्व जनहित याचिका, लेटर्स पेटेंट अपील्स, फस्र्ट अपील्स, टॅक्स अपील्स व अन्य न्यायपीठाला दिल्या नाहीत अशा दिवाणी रिट याचिकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग हे सर्व प्रकारच्या फौजदारी प्रकरणांचे कामकाज सांभाळणार आहेत.

तसेच, न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व विश्‍वास जाधव यांच्या तिसर्‍या युगल न्यायपीठाकडे १९९७ पर्यंतच्या, १९९९, २00१ ते २00५ आणि २0११ ते २0१३ पर्यंतच्या दिवाणी रिट याचिकांचे कामकाज सोपविण्यात आले आहे. गेल्या ३ मार्च रोजी अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती झालेले विश्‍वास जाधव नागपूर खंडपीठात प्रथमच कामकाज करणार आहेत.

न्यायमूर्ती अरुण चौधरी यांच्याकडे सेकंड अपील्स व अन्य न्यायपीठाला दिली नाहीत अशी दिवाणी प्रकरणे, न्यायमूर्ती अशोक भंगाळे यांच्याकडे २000, २00२, २00४, २00६, २00८, २0१0, २0१२ व २0१४ मधील दिवाणी रिट याचिका, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्याकडे अपील्स अगेन्स्ट ऑर्डर्स, दिवाणी पुनर्विचार अर्ज, किरकोळ दिवाणी अर्ज, फस्र्ट अपील्स, न्यायमूर्ती मदनलाल तहलियानी यांच्याकडे नियमित जामीन अर्ज, अटकपूर्व जामीन अर्ज व जामीनासंदर्भातील इतर अर्ज, वर्ष २000 पर्यंतच्या व २0११ नंतरच्या सर्व फौजदारी अपील्स, न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांच्याकडे फौजदारी रिट याचिका, सीआरपीसी ४८२ अंतर्गतचे फौजदारी अर्ज, २00१ ते २0१0 पर्यंतच्या फौजदारी अपील्स व अन्य न्यायपीठाला दिली नाहीत अशी फौजदारी प्रकरणे,

तर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्याकडे १९९७ ते १९९९, २00१, २00३, २00५, २00७, २00९ व २0११ ते २0१३ पर्यंतच्या दिवाणी रिट याचिका आणि दिवाणी अवमानना याचिकांची जबाबदारी राहणार आहे.

यापूर्वी नागपूर खंडपीठात कार्यरत न्यायमूर्ती ए. व्ही. निरगुडे व न्यायमूर्ती पी. आर. बोरा यांची औरंगाबाद खंडपीठ, तर न्यायमूर्ती पी. डी. कोदे, न्यायमूर्ती आर. के. देशपांडे व न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांची मुंबई उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)