शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

सीएद्वारे प्रमाणनाचे विधिवत योग्यता मापन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:20 IST

नागपूर : आचारसंहितेमुळे सीएंनी कर्तव्याचे पालन इमानदारी, निष्ठा आणि व्यावसायिकतेने करावे. कर नियोजनाच्या प्रकरणात ग्राहकांची मदत करावी. त्याकरिता आमच्या ...

नागपूर : आचारसंहितेमुळे सीएंनी कर्तव्याचे पालन इमानदारी, निष्ठा आणि व्यावसायिकतेने करावे. कर नियोजनाच्या प्रकरणात ग्राहकांची मदत करावी. त्याकरिता आमच्या सेवा महत्त्वपूर्ण आहेत. कोणत्याही प्रकरणात ग्राहकाला कर बचावासाठी मदत करू नये. देशनिर्माणसाठी एक भागीदार म्हणून काम करावे. सीएंद्वारे प्रमाणनाचे विधिवत योग्यता मापन व्हावे, असे आवाहन इंडियन द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाचे (आयसीएआय) माजी अध्यक्ष सीए नीलेश विकमसे यांनी येथे केले.

आयसीएआयच्या पश्चिम विभागांतर्गत कार्यरत नागपूर सीए संस्थेतर्फे ‘प्रमाणन आणि योग्यता- संशोधित आचारसंहितेंर्गत काय करावे आणि काय करू नये’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी नागपूर सीए संस्थेचे अध्यक्ष सीए किरीट कल्याणी आणि विभागीय कौन्सिल सदस्य सीए अभिजित केळकर उपस्थित होते.

विकमसे म्हणाले, एकीकडे प्रमाणीकरणामुळे हितधारकांची विश्वसनीयता सुनिश्चित करण्यासाठी मदत मिळते तर दुसरीकडे कर्तव्याचे योग्यरीत्या निर्वहन करण्यााठी व्यावसायिकांना योग्य मदत मिळेल. विकमसे यांनी व्यावसायिक जीवनातील काही उदाहरण सांगितली. व्यावसायिक प्रकरणांची स्थिती आणि अन्य तथ्याच्या सत्यापनाचे कारण आवश्यक प्रमाणीकरणासाठी आवश्यक आहेत. प्रमाणपत्रासाठी लाभार्थीने सादर केलेल्या आवश्यक प्रारूप आणि सामग्रीनुसार नसल्यास ते आवश्यक नाही. त्याला टिपणीसह विधिवत योग्य बनविण्याची आवश्यकता आहे. हितधारकांना सर्व गोष्टींची योग्य स्थिती अवगत करणे आवश्यक आहे.

सीए किरीट कल्याणी म्हणाले, प्रमाणीकरणाच्या प्रकरणात काय करावे आणि काय करू नये तसेच प्रकरणांची आवश्यक योग्यता चांगल्या पद्धतीने ओळखण्याची सीएंना गरज आहे. सीए अभिजित केळकर म्हणाले, सीएंमध्ये कर्तव्य पार पाडण्याची नैतिकता असावी. त्यांनी सीएंना निर्धारित कोडचे नैतिकतेने पालन करण्याचे आवाहन केले. तांत्रिक सत्रात दिल्लीचे माजी अध्यक्ष सीए विवेक खुराना यांनी मार्गदर्शन केले आणि संशोधित आचारसंहितेची माहिती दिली. ‘विकासा’चे अध्यक्ष सीए अक्षय गुल्हाने यांनी संचालन केले. सचिव सीए जितेन सागलानी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. या प्रसंगी सीए इरावती दाणी, सीए हेमेंद्र बदानी, सीए कपिल बहरी, सीए समीर चिटणीस, गिरीश देवधर, सीए हरीश बोनाजा आणि अन्य सीए मोठ्या संख्येने उपस्थित होते.