एक सोहळा कौतुकाचा!

By Admin | Updated: July 2, 2014 01:00 IST2014-07-02T01:00:11+5:302014-07-02T01:00:11+5:30

दहावी तसेच बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या ‘लोकमत’ परिवारातील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. ‘लोकमत’ भवन येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी

A celebration commendation! | एक सोहळा कौतुकाचा!

एक सोहळा कौतुकाचा!

भविष्यासाठी शुभेच्छा : ‘लोकमत’ परिवारातील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार
नागपूर : दहावी तसेच बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या ‘लोकमत’ परिवारातील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. ‘लोकमत’ भवन येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे मंगळवारी हा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. ‘लोकमत’ मीडिया प्रा.लि.चे संचालक (परिचालन) अशोक जैन व तांत्रिक सल्लागार विंग कमांडर (निवृत्त) रमेश बोरा यांनी यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पालकांना शुभेच्छा दिल्या. मंगळवारी आयोजित या कौतुक सोहळ्याला ‘लोकमत’ परिवारातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत पाल्य व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. अक्षय उपरे, परिणय नखाते, यश नारखेडे, कल्याणी हुड, शंतनू चिचमलकर, अनुजा देशपांडे, अभिलाषा पंचपाटकर, राघवी दोरखंडे, कैवल्य जोशी, अंजली घोडवैद्य, वैष्णवी मायी, अदिती कोंगे, हेमांशू बावनकर यांचा गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये समावेश आहे. उज्ज्वल भविष्यासाठी या विद्यार्थ्यांना ‘लोकमत’ परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या. (प्रतिनिधी)

Web Title: A celebration commendation!