शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सीसीटीव्ही कंट्रोल रूम हाँगकाँगच्या धर्तीवर

By admin | Updated: January 14, 2016 03:48 IST

नागपूर शहर हे सीसीटीव्ही सर्व्हिलन्सअंतर्गत आणण्यात येत आहे. त्यासाठी शहरात ७०१ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

७०१ लोकेशन निश्चित : पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांची माहितीनागपूर : नागपूर शहर हे सीसीटीव्ही सर्व्हिलन्सअंतर्गत आणण्यात येत आहे. त्यासाठी शहरात ७०१ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. संपूर्ण शहरावर लक्ष ठेवणाऱ्या या सीसीटीव्हीचे एक नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) राहील. नागपुरातील सीसीटीव्ही कंट्रोल रूम पुणे आणि मुंबईपेक्षा अत्याधुनिक राहणार असून हाँगकाँगच्या धर्तीवर तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांनी बुधवारी पोलीस जिमखाना येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली. यादव यांनी सांगितले की, नागपूर हे स्मार्ट शहर होत आहे. कुठलेही शहर हे तेव्हाच स्मार्ट होऊ शकेल जेव्हा ते सुरक्षित असेल. त्यामुळे शहराच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक भर देत आहेत. याअंतर्गत सीसीटीव्ही सर्व्हिलन्सचा वापर केला जात आहे. पुणे शहर हे संपूर्ण सीसीटीव्ही देखरेखेखाली आले आहे. मुंबईतील एक डिव्हिजन सीसीटीव्हीअंतर्गत आले आहे. नागपूर शहरसुद्धा सीसीटीव्ही सर्व्हिलन्सअंतर्गत येत आहे. त्यादिशेने पोलीस कामाला लागले आहेत. ७०१ ठिकाणे निश्तिच करण्यात आली आहेत. या ठिकाणी तीन प्रकारचे कॅमेरे लावण्यात येतील. सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण शहरावर लक्ष ठेवता येणे शक्य होईल. लवकरच निविदा काढण्यात येईल. या संपूर्ण कामाला किमान एक वर्ष लागेल, असेही त्यांनी सांगितले. यासोबतच सायबर सेल व नियंत्रण कक्षालाही आधुनिकीकरण करण्याची योजना आहे. पत्रपरिषदेला पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त संजय लाटकर, पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार, पोलीस उपायुक्त ईशू सिंधू, पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर, पोलीस उपायुक्त संजय लाटकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)