शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या भांडणात ‘जात पडताळणी’ बंद

By admin | Updated: March 9, 2015 02:01 IST

समाजकल्याण आणि महसूल या दोन विभागातील अधिकाऱ्यांच्या भांडणामुळे सध्या जात

गरीब विद्यार्थ्यांना फटका : २ लाख ४० हजार अर्ज प्रलंबित नागपूर : समाजकल्याण आणि महसूल या दोन विभागातील अधिकाऱ्यांच्या भांडणामुळे सध्या जात पडताळणीचे काम बंद पडले आहे. परिणामी २ लाख ४० हजार अर्ज प्रलंबित आहेत. यामध्ये ७२ हजार अर्ज मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे तर १ लाख ६७ हजार अर्ज विद्यार्थ्यांचे आहेत. जात पडताळणीचे काम बंद असल्याने मागासवर्गीयांची पदोन्नती आणि विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे. तेव्हा जात पडताळणीचे काम तातडीने सुरू करून जात वैधता प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी केली आहे. यासंबंधात इंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचेही निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १९३२ मध्ये इंग्रज सरकारने अस्पृश्यांसाठी ‘बॅकवर्ड क्लास’ विभाग सुरू केला. १९४२-४३ ला पोस्ट एसएससी शिष्यवृत्ती सुरू केली. १९४८ ला समाजकल्याण खाते सुरू करण्यात आले. १९७४ साली जात पडताळणी विभाग सुरू करण्यात आला. पुढे महसूल खात्यातील अपर जिल्हाधिकारी यांना समितीचे अध्यक्ष केले. समाज कल्याण विभाग आणि महसूल विभाग यांच्या भांडणामुळे जात पडताळणी बंद झाली. तेव्हा ही जातपडताळणी तातडीने सुरू करण्यात यावी. तसेच गडचिरोली येथील स्कॉलरशीप घोटाळ्यामुळे शिष्यवृत्ती मंजूर करण्याचे कामच थांबवण्यात आले आहे. त्यामुळे १० लाख विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. आता आॅनलाईन अर्ज भरण्यात येत असल्याने काहीही कळायला मार्ग नाही. त्यामुळे त्यांना प्राचार्याच्या शिफारशीवरच अवलंबून राहावे लागते. कोणता नवीन अभ्यासक्रम सुरू झाला याची माहिती विद्यापीठ देत नाही. तेव्हा याकडेही शासनाने लक्ष घालावे, अशी मागणी इंगळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)