शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावरील कार्गो स्कॅनिंग मशीन बंद

By admin | Updated: January 5, 2016 03:17 IST

पंजाबातील पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नागपूर : पंजाबातील पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षेबाबत मात्र प्रचंड निष्काळजी बाळगली जात आहे. गेल्या महिनाभरापासून एअरपोर्टवरील कार्गो स्कॅनिंग मशीन बंद-सुरू होत असल्याचा प्रकार सुरू आहे. विशेष म्हणजे याबाबत एअरपोर्ट प्राधिकरण गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार विमानतळावर दोन स्कॅनिंग मशीन आहेत. एक एअर इंडिया आणि दुसरी खासगी विमानसेवा कंपनीची आहे. गेल्या महिनाभरापासून एअर इंडियाची कार्गो स्कॅनिंग मशीन तांत्रिक खराबीमुळे बंद पडली आहे. याबाबत एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, एक महिन्यापासून एअरपोर्ट प्राधिकरणची स्कॅनिंग मशीन बंद आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या स्कॅनिंग मशीनची मदत घेतली आहे. अधिक भार वाढल्याने आमचीही स्कॅनिंग मशीन बंद पडली आहे. एअरपोर्ट प्राधिकरणाचे एक अधिकारी अवधेश प्रसाद यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या स्कॅनिंग मशीनमध्ये कुठलीही अडचण नाही. ती चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. कुणीही कधीही त्याची तपासणी करू शकतो.सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्हनागपूर सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील शहर मानले जाते. दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरासह नागपुरातही सुरक्षेबाबत विशेष दक्षता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत विमानतळावरील स्कॅनिंग मशीन बंद असणे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारे आहे. विमानतळावरील अधिकारी सर्वकाही व्यवस्थित असल्याचा दावा करीत असले तरी कुरिअर सेवा प्रभावित झाल्याने त्यांचा दाव्याची पोल उघडकीस आली आहे.