शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘एमफुक्टो’तर्फे (महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अ‍ॅन्ड कॉलेज टीचर्स असोसिएशन) २५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शैक्षणिक विभाग व संलग्नितमहाविद्यालयातील अभ्यास ठप्प पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यामुळे हिवाळी परीक्षांवर प्रभाव पडू शकतो का, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. ...

ठळक मुद्दे२५ सप्टेंबरपासून बसणार फटका : हिवाळी परीक्षेवर पडू शकतो प्रभाव

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘एमफुक्टो’तर्फे (महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अ‍ॅन्ड कॉलेज टीचर्स असोसिएशन) २५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शैक्षणिक विभाग व संलग्नितमहाविद्यालयातील अभ्यास ठप्प पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यामुळे हिवाळी परीक्षांवर प्रभाव पडू शकतो का, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विद्यापीठ प्रशासनाने संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी कुठलीही पावले उचललेली नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, ‘एमफुक्टो’ने पाच प्रमुख मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. यात शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा, विद्यापीठातील रिक्त जागा भरण्यात याव्या, यांचा समावेश होता. विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होत आहेत. त्यामुळे महाविद्यालय व शैक्षणिक विभागांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जर अशात कामबंद आंदोलन झाले तर त्याचा परिणाम अध्यापन कार्यावर होईल.काही शिक्षकांकडून बंदचा विरोधदरम्यान, ‘एमफुक्टो’कडून पुकारण्यात आलेल्या कामबंद आंदोलनाविरोधात काही शिक्षकांनी विरोधी भूमिका घेतली आहे. अशाप्रकारचे आंदोलन हे बेकायदेशीर आहे. या आंदोलनाच्या बहाण्याने शिक्षक आपल्या जबाबदारीपासून दूर पळत आहेत, असे मत नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी व्यक्त केले. यासंबंधात त्यांनी राज्य शासनालादेखील पत्र लिहिले आहे.शिक्षण मंच सहभागी होणार नाहीविद्यापीठ शिक्षण मंच या आंदोलनात सहभागी होणार नाही, असे मंचच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे यांनी स्पष्ट केले आहे. हे आंदोलनच चुकीचे आहे. ‘एमफुक्टो’चे पदाधिकारी चुकीची माहिती देऊन शिक्षकांची दिशाभूल करीत आहेत. हे आंदोलन विद्यार्थीहिताच्या विरोधात आहे, असेदेखील त्या म्हणाल्या.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठagitationआंदोलन