शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

By योगेश पांडे | Updated: September 10, 2025 23:08 IST

दुचाकीवरील हल्लेखोरांचा युद्धपातळीवर शोध सुरू

नागपूर: कडबी चौकात एका व्यापाऱ्यावर भर रस्त्यात अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला व त्याच्याजवळील जवळपास ५० लाखांची रक्कम लुटून पळ काढला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या गोळीबारात व्यापारी जखमी झाला आहे. संबंधित रक्कम हवालाशी निगडीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून ‘ऑल इज वेल’चे दावे करण्यात येत असले तरी शहरात गुंडांची हिंमत वाढत असल्याचेच चित्र आहे.

राजू दिपानी (जरीपटका) असे जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे. ते व्यापारी असून गुजरातमधील एका कंपनीसाठीदेखील डेटा फिडिंगचे काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे १० नंबर पुलाजवळ कार्यालय आहे. रात्री आठ वाजताच्या सुमारास ते कार्यालयातून निघाले व चौकातून आतील भागात शिरले. तेथे बाबा नावाच्या व्यक्तीच्या घरासमोरून ते दुचाकीने जात असताना मोटारसायकलवरून दोन आरोपी आले व त्यांनी दिपानी यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातात स्प्रे पाहून दिपानी यांनी धोका ओळखून तेथून निघण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्यांच्यावर पिस्तुलाने तीन गोळ्या झाडल्या.

यामुळे दिपानी खाली पडले. त्यांच्याजवळील पैशांची बॅग घेऊन आरोपींनी पळ काढला. गोळ्यांचा आवाज ऐकून वस्तीतील लोक जमा झाले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. दिपानी यांच्या पाठीला गोळी लागली होती. जरीपटका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले व जखमी दिपानी यांना मॅक्स इस्पितळात दाखल करण्यात आले. यानंतर तेथे वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील दाखल झाले. याशिवाय फॉरेन्सिकचे पथकदेखील पोहोचले. घटनास्थळी पोलिसांना तीन गोळ्यांची आवरणे आढळली. या गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे. रात्री उशीरापर्यंत आरोपींचा शोध सुरू होता.

बराच वेळापासून पाठलागाची शक्यतासंबंधित आरोपी दिपानी यांचा बराच वेळापासून पाठलाग करत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांनी दिपानी मुख्य रस्त्यापासून आत शिरल्यानंतर त्यांना अडविण्याचा प्रयत्न करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हा प्रकार व्यापारातील वर्चस्वातून झाला आहे का तसेच संबंधित रक्कम हवालाशी निगडीत होती का या दिशेनेदेखील शोध सुरू आहे. दिपानी यांनी अगोदर बॅगेत दोन लाख असल्याचे सांगितले. मग आकडा पाच लाखांवर गेला. त्यानंतर ५० लाखांची बाब समोर आली. त्यांनी नेमके किती पैसे होते हे सांगण्यात लपवाछपवी केल्याने तो पैसे हवालाशी निगडीत असल्याचा पोलिसांचा संशय आणखी बळावला.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरूया घटनेनंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तातडीने संबंधित भागातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. या भागातील निवासस्थानांमधील सीसीटीव्हीचीदेखील चाचपणी करण्यात येत आहे. दिपानी यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजदेखील ताब्यात घेण्यात आले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFiringगोळीबारRobberyचोरी