शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकाची इमारत लवकरच पाडणार

By admin | Updated: September 5, 2016 02:41 IST

नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात विकासकामांना गती देण्यासाठी लवकरच जुनी ‘हमाल बिल्डिंग’ लवकरच पाडण्यात येणार आहे.

सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा : विकासकामांना येणार गतीनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात विकासकामांना गती देण्यासाठी लवकरच जुनी ‘हमाल बिल्डिंग’ लवकरच पाडण्यात येणार आहे. हे काम २० सप्टेंबरपासून सुरूहोणार आहे. ‘हमाल बिल्डिंग’ जयस्तंभ चौकाजवळ मेनगेटला लागून आहे. या दोन मजली इमारतीत लोको रनिंग स्टाफची रेस्ट रुम, रेल्वे संघटनांचे कार्यालय आहेत. या कार्यालयांना यापूर्वी स्थानांतरित करण्यात आले आहे. परंतु लोको रनिंग स्टाफच्या रेस्ट रुमला स्थानांतरित करण्यावरून काही महिन्यांपासून ही इमारत पाडण्याचे काम रखडले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे मेल सर्व्हिस (आरएमएस) बिल्डींगमध्ये नॅशनल रेल्वे मजदूर युनियन आणि सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे कार्यालय आहे. ही जागा दोन हजार चौरसफुटांची आहे. या ठिकाणी ‘हमाल बिल्डिंग’च्या रनिंग लोको स्टाफच्या रेस्ट रुमला स्थानांतरित करण्याची योजना होती. परंतु संबंधित रेल्वे संघटनांनी जागा खाली करण्यास नकार दिला होता. यामुळे ‘हमाल बिल्डिंग’ पाडण्याचे काम अडकून पडले होते. परंतु आता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या प्रशासनाने संबंधित संघटनांशी चर्चा करून त्यांची मंजुरी मिळविली असून २० सप्टेंबरला ही इमारत पाडण्याचे काम सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)सर्व प्रकरणांचा निपटारा झाला‘हमाल बिल्डिंग’ लवकरच पाडण्यात येणार आहे. आता रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील विकासकामांना गती येणार आहे. यामुळे कार्यालयाचे स्थानांतरण करण्याबाबतच्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत.’बृजेश कुमार गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग