शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरने केले दाम्पत्याचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2016 02:46 IST

अजनी पोलीस ठाणे हद्दीतील रामेश्वरी रोड काशीनगर येथील एका दाम्पत्याचे भूखंड हडपण्यासाठी अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

भूखंड हडपण्याचा आरोप : अजनीत गुन्हा दाखल नागपूर : अजनी पोलीस ठाणे हद्दीतील रामेश्वरी रोड काशीनगर येथील एका दाम्पत्याचे भूखंड हडपण्यासाठी अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अजनी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. करण नामदेवराव महल्ले (४५) असे आरोपीचे नाव आहे. सूत्रानुसार बसपाचे संस्थापक कांशीराम यांचे विश्वासू सहकारी दिवंगत डॉ. पंढरीनाथ वैद्य यांचा काशीनगर चौकात साडेचार हजार वर्गफुटाचा भूखंड आहे. या ठिकाणी ते कुटुंबासह राहत होते. त्यांनी अनेक वर्षांपूर्वी आपल्या घरासमोरच कांशीराम यांना एक खोली पक्ष कार्यालयासाठी दिली होती. सन २०१२ मध्ये डॉ. पंढरीनाथ वैद्य यांचा मृत्यूनंतर त्यांची पत्नी, दोन मुलं आणि मुलगी त्याच घरात राहत होते. परंतु काही दिवसानंतर मुलगा अतुल वैद्य हा पत्नी वंदनासोबत त्याच घरातील दुसऱ्या खोलीत वेगळा राहू लागला होता. काही दिवसांपूर्वी बिल्डरने अतुलची आई व कुटुंबीयांसोबत भूखंडाचा सौदा केला. कार्यालयाच्या जागेऐवजी इमारतीमध्ये जागा देण्यासंबंधी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसोबत करार केला. परंतु अतुल आपली खोली रिकामी करायला तयार नव्हता. गेल्या १२ आॅगस्ट रोजी रात्री बिल्डरचे काही लोकं आले. त्यांनी अतुल व त्याच्या पत्नीला खोली खाली करायला सांगितले. परंतु त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांनी अतुल व त्याच्या पत्नीला बळजबरीने नेले. तेव्हापासून ते दोघेही बेपत्ता आहेत. अतुल यांचे साळे गौतम खडतकर यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बिल्डर व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)