शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

सात निवडणुकीचा ‘रेकॉर्ड ब्रेक’

By admin | Updated: May 18, 2014 01:02 IST

नागपूर रामटेक लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताने विजयी होण्याचा मान हा १९७१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या अमृत सोनार यांना जात असला

मताधिक्क्याने विजयी : १९८४ ची नोंद मात्र कायमच!

गणेश खवसे - नागपूर रामटेक लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताने विजयी होण्याचा मान हा १९७१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या अमृत सोनार यांना जात असला तरी १९८९ नंतर मात्र एवढ्या मोठ्या फरकाने विजयी होण्याचा मान एकाही उमेदवाराला मिळाला नाही. विशेष म्हणजे १९९१ ची निवडणूक वगळता त्यानंतरच्या निवडणुकीत लाखांवर मतांच्या फरकाने विजयी होण्याचा मान एकाही उमेदवाराला मिळाला नाही. तब्बल सात निवडणुकीचा निकाल ‘ब्रेक’ करीत शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांनी १६ लोकसभेत इतिहास रचला. या मतदारसंघातून सर्वाधिक २ लाख ३१ हजार ७४२ मतांनी विजयी होण्याचा मान हा काँग्रेसच्या अमृतराव सोनार यांना जातो. त्यांनी हा रेकॉर्ड १९७१ मध्ये केला. त्यानंतर काँग्रेसच्याच जतिराम बर्वे यांनी देशातून दुसर्‍या क्रमांकाच्या मताधिक्क्याने विजयी होण्याचा मान मिळविला तरी रामटेक लोकसभा मतदारसंघातील सोनार यांचा विक्रम मोडू शकले नाही. त्यानंतर १ लाख ८५ हजार ९७२ मतांनी पी. व्ही. नरसिंहराव हे १९८४ मध्ये विजी झाले. १९८९ मध्ये मात्र हा फरक केवळ ३४ हजार ४७० वर आला. १९९१ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तेजसिंहराव भोसले यांनी भाजपच्या पांडुरंग हजारे यांना १ लाख ३७ हजार ९५४ मतांनी पराभव केला. या निवडणुकीनंतर मात्र ७० हजाराच्या आतच हा फरक राहिला. १९९६ मध्ये दत्ता मेघे हे २५ हजार ७२२, १९९८ मध्ये चित्रलेखा भोसले या ६७ हजार ३८, १९९९ मध्ये शिवसेनेचे सुबोध मोहिते हे ११ हजार ६८९, २००४ मध्ये सुबोध मोहिते हे १४ हजार १०२ तर २००९ मध्ये काँग्रेसचे मुकुल वासनिक हे १६ हजार ७०१ मतांच्या फरकाने विजयी झाले. या सर्व निकालांची परंपरा मोडत कृपाल तुमाने यांनी इतिहास रचला. त्यांनी या निवडणुकीत ५ लाख १९ हजार ८९२ मते घेत काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांचा तब्बल १ लाख ७५ हजार ७९१ मतांनी पराभव केला. वासनिक यांना ३ लाख ४४ हजार १०१ मते पडली. शिवसेनेचा विक्रम मोडला रामटेक लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत दोन सार्वत्रिक तर एका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला. १९९९ च्या निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेना उमेदवार असलेल्या सुबोध मोहिते यांनी रामटेकच्या गडावर भगवा फडकविला. त्यानंतरच्या निवडणुकीत अर्थात २००४ च्या निवडणुकीतही शिवसेनेकडून त्यांनीच विजय संपादन केला. मात्र या दोन्ही निवडणुकीत अनुक्रमे ११ हजार ६८९, १४ हजार १०२ मतांनी ते विजयी झाले. याशिवाय २००७ च्या पोटनिवडणुकीत प्रकाश जाधव यांनी यापूर्वीचे शिवसेनेचे विक्रम मोडले. ते ३२ हजार ५७२ मतांनी विजयी झाले. मात्र या निवडणुकीत शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी सुवर्णवेध साधला. त्यांनी १ लाख ७५ हजार ७९१ मतांनी विजय मिळविला. हे मताधिक्क्य शिवसेनेचे ‘टॉप’वर आहे.