शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रिजनच्या आराखड्यावर मंथन

By admin | Updated: March 14, 2015 02:44 IST

नागपूर महानगर क्षेत्र विकास योजनेचा आराखडा कसा राहील. यात रहिवासी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सार्वजनिक वापराच्या जागा, विविध क्षेत्रासाठी आरक्षित असलेल्या ....

नागपूर : नागपूर महानगर क्षेत्र विकास योजनेचा आराखडा कसा राहील. यात रहिवासी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सार्वजनिक वापराच्या जागा, विविध क्षेत्रासाठी आरक्षित असलेल्या जमिनीसंदर्भात लोकांच्या शंका व तक्रारींचे निराकरण, सूचना जाणून घेण्यासंदर्भात कॉन्फेडरेशन आॅफ, रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन आॅफ इंडिया (क्रेडाई) यांच्या सूचनेवरून नासुप्रतर्फे नैवेद्यम सभागृहात शुक्र वारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. आर्किटेक्चर असोसिएशन यांच्यासह विविध व्यापार व उद्योग सघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.नागपूर महानगर क्षेत्रामध्ये (एनएमए) शहराच्या हद्दीबाहेरील ३५८७ वर्ग कि.मी.क्षेत्रातील ९ तालुक्यातील ७२१ गावांचा समावेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या भागातील लोकसंख्या १०.६२ लाख आहे. या क्षेत्राचा संतुलित आणि नियोजनबद्ध विकास करण्याचे अधिकार सुधार प्रन्यासकडे सोपवण्यात आले. त्यानुसार पुढील २० वर्षासाठी ही विकास योजना तयार करण्यात आली आहे.औद्योगिक विकासासोबतच कृषी विकासही तितकाच महत्त्वाचा आहे. ही बाब विचारात घेता कृषीसाठी क्षेत्र राखीव दर्शविण्यात आले आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यातील रहिवासी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, आरक्षित जागा, शेतीची जमीन या संदर्भात विकास आराखड्याची लोकांना महिती व्हावी, सोबतच यावरील शंका व तक्रारींचे निराकरण व्हावे, या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती क्रे डाईचे प्रदेश अध्यक्ष प्रशांत सरोदे यांनी दिली. विकास आराखड्यासंदर्भात सूचना व तक्रारी २६ एप्रिलपर्यत स्वीकारल्या जाणार आहेत. मेट्रो रिजनच्या कार्यालयात त्या स्वीकारल्या जातील. त्यावर सुनावणी होऊन अंतिम आराखडा तयार केला जाणार असल्याची माहिती मेट्रो रिजनच्या अधिकाऱ्यांनी दिली. जुन्या व प्रस्तावित विकास आराखड्यात असलेला बदल व प्रस्तावित योजनांची उपस्थितांना माहिती देण्यात आली. क्रेडाईचे सचिव अनिल नायर, उपाध्यक्ष महेश अडवाणी, विजय दर्गन, अशोक चांडक, सिद्धार्थ सराफ आर्किटेक्चर असोसिएशनचे पदाधिकारी अशोक मोटवा, परमजीत आहुजा आदींनी शंका उपस्थित केल्या तसेच उपयुक्त सूचना मांडल्या. अधीक्षक अभियंता (ंंमेट्रो) प्रवीण किडे, संचालक सुजाता कडू यांनी उपस्थितांच्या शंका व तक्रारी जाणून त्याचे निराकरण केले. (प्रतिनिधी)