शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा भोजनावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 02:02 IST

अनेकदा तक्रारी करूनही वसतिगृहात चांगले जेवण मिळत नसल्यामुळे सोमवारी विद्यार्थ्यांनी जेवणावरच बहिष्कार टाकला.

मेसचालक बदलविण्याची मागणी : अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने सुटला वाद लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेकदा तक्रारी करूनही वसतिगृहात चांगले जेवण मिळत नसल्यामुळे सोमवारी विद्यार्थ्यांनी जेवणावरच बहिष्कार टाकला. ही घटना काटोल नाका चौकातील मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात घडली. विद्यार्थ्यांनी मेस चालकास जेवणच बनवू दिले नाही. त्यामुळे विद्यार्थी सकाळचा नाश्ता व जेवणापासून वंचित राहिले. काही विद्यार्थ्यांनी बाहेरून नाश्ता आणून आपली भूक भागविली. दरम्यान समाजकल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शेवटी मेसचालक बदलवून देण्याच्या आश्वासनानंतर हा वाद मिटला. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी बाहेरून जेवणाची व्यवस्था केली. काटोल नाका चौकात मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृह आहे. १५० मुलांची या वसतिगृहाची क्षमता आहे. येथील विद्यार्थ्यांच्या जेवणाबाबत नेहमीच तक्रारी राहिल्या आहेत. जेवण व्यवस्थित राहत नाही. चविष्ट राहत नाही. नियमानुसार पदार्थ उपलब्ध करून दिले जात नाही. आदी अनेक तक्रारी होत्या. या तक्रारीवरून काही दिवसांपूर्वीच येथील मेसचालकाला जावे लागले होते. परंतु तरीही जेवणात मात्र काहीही फरक पडला नाही. रविवारी यावरूनच विद्यार्थ्यांचा वाद झाला. त्यांनी मेसचालकास उद्यापासून तू जेवण करायचे नाही, असे म्हटले. त्यामुळे मेसचालक आज सकाळी आलाच नाही. याबाबत समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विजय वाकुलकर यांनी तातडीने वसतिगृहाला भेट दिली. विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी आपले गाऱ्हाणे सांगितले. मेसचालक बदलून मागितला. मेस कॉन्ट्रॅक्टरलाही बोलावण्यात आले. त्यांच्याशीही चर्चा झाली. सायंकाळी उशिरापर्यंत ही चर्चा सुरूच होती. परंतु विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम होते. अखेर वाकुलकर यांनी नवीन मेसचालक देण्याचे आश्वासत दिले. परंतु इतक्या लवकर नवीन मेसचालक कसा मिळेल? असे सांगत काही दिवस वाट पाहण्यास सांगितले. तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था बाहेरून करून देण्याची व्यवस्थाही त्यांनी केली. यानंतर हा वाद मिटला. समोशावर काढला दिवस दरम्यान सकाळी मुलांनी नाश्ता व जेवण केले नाही. काही मुलांच्या परीक्षा सुरू होत्या. त्यामुळे त्यांनी बाहेरून समोसा बोलावून आपली भूक भागवित दिवस काढला.