शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात व आंध्रातील बोगस बियाणे महाराष्ट्रात शेतकऱ्यांनो सावधान !

By admin | Updated: May 9, 2014 01:47 IST

शेतीतील समस्यांचा फायदा घेऊन गुजरात आणि आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात बोगस बियाणे दाखल झालेले आहेत. नानाविध नावाने असलेली ही नकली बियाणे बाजारात नव्हे,

मानवी साखळीच्या मदतीने विक्री

राजेश भोजेकर - वर्धा

शेतीतील समस्यांचा फायदा घेऊन गुजरात आणि आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात बोगस बियाणे दाखल झालेले आहेत. नानाविध नावाने असलेली ही नकली बियाणे बाजारात नव्हे, तर मनुष्य साखळीच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या माथी मारली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. शेतामध्ये मजूर आणि तणाचा गंभीर प्रश्न आवासून उभा आहे. मजूर मिळविणे म्हणजे गड जिंकल्यासारखे झाले आहे. मजुराला वेळोवेळी आमिष देऊन, वाढीव मजुरी देऊन शेतात आणावे लागते. तरीही वेळेवर मजूर मिळत नाही आणि पाहिजे तसे आणि तितके काम होत शेतात होत नाही. त्या शिवाय तणाचा प्रश्नही मोठा आहे.

तण हे मुख्य पिकाशी पाणी, खतद्रव्ये, प्रकाश आणि जागा या बाबतीत स्पर्धा करते. त्यामुळे पिकाचे ५०-७० टक्केपर्यंत नुकसान करते. परिणामी उत्पन्नामध्ये घट येते. याचाच फायदा घेत गुजरात आणि आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात नानाविध नावाने खोटे, बेकायदेशीर, बोगस, नकली, नपुंसक बियाणे महाराष्ट्राच्या बाजारात दाखल झाल्याची भीती कृषी विभागाने वर्तविली आहे. हे बियाणे गावागावात दलालामार्फत विकले जात आहे. एकदा वापर करुन बघा, या तत्त्वावर शेतकर्‍यांना घेण्यास बाध्य करीत असल्याचेही कृषी विभागाचे म्हणणे आहे. वर्धेत हे बियाणे आढळल्याचे कृषी विभागाने मान्य केले आहे. हे बियाणे हे कुठल्या तंत्रज्ञानाने बनले आहे ते माहिती नाही. तसेच मान्यताप्राप्त कंपन्यांची बियाणे वगळता इतर कुठल्याही प्रकारचे बियाणे शेतकर्‍यांनी वापरु नये.

या बियाण्यांमुळे शेतावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता दाट आहे. असे बियाणे कुठलीही चाचणी पास केलेले नसते, त्यामुळे ते कितपत खरे आह,े याची काहीही खात्री नाही. कोणतीही व्यक्ती अशा प्रकारचे बियाणे विकत असताना किंवा लागवड करुन असताना आढळल्यास त्यांच्यावर बियाणे नियंत्रण आदेश १९८३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कृषी विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा बियाण्यांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी राज्यभरासाठी १८००२३३४०००, वर्धा जिल्ह्यासाठी ०७१५२-२५५००९९ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहे.