शेतातील विहिरीत मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:07 IST2021-07-24T04:07:38+5:302021-07-24T04:07:38+5:30

कामठी : कामठी-शिरपूर मार्गावरील घाेरपड (ता. कामठी) शिवारातील विहिरीत शुक्रवारी (दि. २३) सकाळी ८ वाजताच्या सुमारास ३८ वर्षीय व्यक्तीचा ...

Bodies were found in a field well | शेतातील विहिरीत मृतदेह आढळला

शेतातील विहिरीत मृतदेह आढळला

कामठी : कामठी-शिरपूर मार्गावरील घाेरपड (ता. कामठी) शिवारातील विहिरीत शुक्रवारी (दि. २३) सकाळी ८ वाजताच्या सुमारास ३८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पाेलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

रवी गणपत कडू (३८, रा. घोरपड, ता. कामठी) असे मृताचे नाव आहे. घाेरपड शिवारात प्रेमचंद शंकर खोत, रा. घाेरपड यांचे शेत असून, त्यांच्या शेतातील विहिरीत रवीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर लगेच मृताची ओळख पटली. रवी १५ दिवसापासून गावात नव्हता. पत्नीने त्याला पाच वर्षापूर्वी साेडचिठ्ठी दिली हाेती. त्याला दारूचे व्यसन हाेते, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. त्याने दारूच्या नशेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज ठाणेदार विजय मालचे यांनी व्यक्त केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजय धोंगडे करीत आहेत.

Web Title: Bodies were found in a field well