लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिगारेटचे बिल देण्यावरून एका टोळीने बारसमोर रक्तरंजित राडा घातला व एका ऑटोचालकाला बेदम मारहाण करत जीव घेण्याचा प्रयत्न केला. कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पोलिसांचा गुन्हेगारांवर काही वचक राहीला आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे.
शेख अकील शेख जलील (वय ४५, यशोधरानगर) हे ऑटोचालक असून, २० एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ते त्यांच्या मित्रांसह टेकानाका येथील हायवे बार अँड रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपल्यानंतर ते पार्किंग परिसरात आले असता, तेथे उपस्थित असलेल्या अजहर नावाच्या तरुणाने सिगारेटचे बिल भरण्यास सांगितले. ‘आम्ही तुझे बिल का भरू?’ असे शेखने म्हणताच अजहरने वाद घालण्यास सुरुवात केली. वाद चिघळताच अजहर आणि त्याचा साथीदार हुसेन ऊर्फ अरमान लोचा यांनी फिर्यादीसोबत शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अजहरने फोन करून राजा हिरोती याला घटनास्थळी बोलावले. काही वेळातच राजा हिरोती हा आणखी ५ ते ६ जणांसह मोटारसायकलवर तेथे आला. त्यांच्या हातात चाकू आणि लोखंडी रॉड होते.
आरोपींनी येताच शेखचा जीव घ्या, असा इशारा देत हल्ला चढवला. या हल्ल्यात शेखच्या डोक्यावर रॉडने प्रहार करण्यात आला तसेच हातावर वार करून बोट तोडले. त्यांच्या पोटावरही वार करण्यात आले. दरम्यान, फिर्यादीला वाचविण्यासाठी आलेल्या त्यांचा मित्र मोहम्मद आसिफ ऊर्फ सोनू बसिर शेख (३४, भिलगाव) या मित्रावरही आरोपींनी चाकूने हल्ला केला. त्याच्या मानेजवळ व पायावर वार झाल्याने तोही जखमी झाला. हल्ल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या दुचाकीची तोडफोड करून सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान केले. जखमी अवस्थेत दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. शेखच्या तक्रारीवरून पोलिसांनी अजहर, हुसेन ऊर्फ अरमान लोचा, राजा दिहोती, फरान ऊर्फ फर्रा, पिंटू, इरफान शेख व इतर दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Summary : A cigarette bill argument escalated into a violent brawl outside a Nagpur bar. An auto driver was severely beaten and his vehicle damaged. Police have registered a case against multiple individuals involved in the attack.
Web Summary : नागपुर में सिगरेट के बिल को लेकर बार के बाहर हिंसक झड़प हुई। एक ऑटो चालक को बुरी तरह पीटा गया और उसके वाहन को क्षतिग्रस्त कर दिया गया। पुलिस ने हमले में शामिल कई लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है।