शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

"आमच्या धमन्यात विदर्भाचे रक्त, आम्हाला विदर्भ प्रेम कुणी शिकवू नये," मुख्यमंत्र्यांची गर्जना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 18:40 IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उद्घाटन आज संपन्न झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नामकरणाला विरोध करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी खडेबोल सुनावले आहेत.

नागपूर - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उद्घाटन आज संपन्न झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नामकरणाला विरोध करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी खडेबोल सुनावले आहेत. आमचे आजोळ विदर्भातील म्हणजे परतवाड्यातील आहे. त्यामुळे आमच्या धमण्यात विदर्भाचे रक्त वाहत आहे. त्यामुळे विदर्भ बाबतचे प्रेम आम्हाला कोणी शिकवू नये किंवा अपप्रचार देखील करू नये, असे खडेबोल उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहेत.उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचे आजोळ विदर्भातील म्हणजे परतवाड्यातील आहे. त्यामुळे आमच्या धमण्यात विदर्भाचे रक्त वाहत आहे. त्यामुळे विदर्भ बाबतचे प्रेम आम्हाला कोणी शिकवू नये किंवा अपप्रचार देखील करू नये. या क्षणापासून विदर्भाच्या विकासाकडे कसलेही दुर्लक्ष होणार नाही. आपणाला एकसंघ आणि सक्षम महाराष्ट्र घडवायचा आहे.महाविकास आघाडीचे यापुढील प्रत्येक पाऊल हे विदर्भाच्या विकासाचे असेल.नागपुरातील या प्राणी संग्रहालय एवढा देशात एकही झू नसावा. नागपुरात सिंगापूर नंतर नाईट सफारी सुरू केली जाणार आहे टुरिझम ही एक इंडस्ट्रीज आहे त्या दृष्टीने व नंतर विकास करणे ही आमची प्राथमिकता असेलसुरजागड चा प्रकल्प देखील आम्हाला लवकरच मार्गी लावायचा आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.या सरकारबाबत विकासासंदर्भातील गैरसमज जाणून-बुजून पसरवला जात आहे. मात्र गोसेखुर्दच्या पाण्यानेच आम्हाला तो धुवून काढायचा आहे. नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग चे लोकार्पण 1 मे रोजी करण्याचा आमचा मानस आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूर