शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या गंजावरून खून

By admin | Updated: July 15, 2015 03:40 IST

चोरीच्या गंजावरून उद्भवलेल्या वादातून यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या साथीदार चोराचा खून केल्याचा आरोप ...

आरोपीस जामीन नाकारलानागपूर : चोरीच्या गंजावरून उद्भवलेल्या वादातून यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या साथीदार चोराचा खून केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. शेख सलीम शेख हकीम (३६) रा. कुतुबशहानगर गिट्टीखदान, असे आरोपीचे नाव आहे. शेरखान ऊर्फ शेरू छोटेखान (४५) रा. वैशालीनगर घाट, असे मृताचे नाव आहे. त्याचा १९ डिसेंबर २०१४ रोजी पिवळी नदी स्मॉल फॅक्टरी एरिया भागातील चुना कंपनीसमोर राफ्टरने डोक्यावर मारून खून करण्यात आला होता आणि मृतदेह बेवारस स्थितीत फेकून देण्यात आला होता. प्रकरण असे की, खुनाच्या घटनेच्या एक महिन्यापूर्वी शेरखान आणि मोहम्मद जावेद ऊर्फ लंगड्या नूर मोहम्मद (२९) रा. टिपू सुलतान चौक यांनी सक्करदरा भागातून अ‍ॅल्युमिनियमचा गंज चोरला होता. दोघेही आॅटोरिक्षात बसून गंज विकण्यासाठी जात असताना शेरखान लघुशंकेसाठी थांबला असता संधी साधून लंगड्या हा एकटाच निघून गेला होता. गंज विकून त्याने एकट्यानेच पैसे हडपले होते. १७ डिसेंबर रोजी लंगड्या हा वैशाली घाटाजवळ गवसताच शेरखान याने त्याच्या पोटाला वस्तरा लावून त्याच्याजवळील पैसे हिसकावून घेतले होते. या घटनेचा सूड म्हणून लंगड्याने शेरखानला संपवण्याचे ठरवले होते. यासाठी त्याने मोहम्मद वसीम मोहम्मद रऊफ अन्सारी आणि शेख सलीम यांची मदत घेतली होती. या तिघांनी शेरखानला वैशालीनगर घाट येथे गाठले होते. त्याला आॅटोरिक्षात बसवून गर्द पाजली होती. आरोपींनीही गर्द घेतली होती. घटनास्थळी नेऊन त्याचा खून केला होता. यशोधरानगर पोलिसांनी खुनाचा छडा लावून तिन्ही आरोपींना अटक केली होती. त्यापैकी शेख सलीमने जामीन अर्ज दाखल करताच न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रशांत भांडेकर आणि संदीप डोंगरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)