श्रद्धेय बाबूजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर

By Admin | Updated: July 2, 2014 01:01 IST2014-07-02T01:01:14+5:302014-07-02T01:01:14+5:30

लोकमतचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी, दि. २ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० पासून

Blood Donation Camp today on the occasion of the birth anniversary of the revered Babuji | श्रद्धेय बाबूजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर

श्रद्धेय बाबूजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर

नागपूर : लोकमतचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी, दि. २ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० पासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लोकमत भवन, बी विंग, ११ वा माळा येथे शिबिर सुरू असेल. लोकमत व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमत परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Blood Donation Camp today on the occasion of the birth anniversary of the revered Babuji