शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

इंदोऱ्यात जोरदार स्फोट

By admin | Updated: November 18, 2016 03:00 IST

जिवंत बारुद बाटलीत भरून रसायन तयार करण्याच्या प्रयत्नात जोरदार स्फोट झाल्यामुळे एक घर जमिनदोस्त झाले.

घर जमिनदोस्त : कथित जादूगार पोलिसांच्या ताब्यात नागपूर : जिवंत बारुद बाटलीत भरून रसायन तयार करण्याच्या प्रयत्नात जोरदार स्फोट झाल्यामुळे एक घर जमिनदोस्त झाले. स्फोटामुळे छत कोसळल्याने प्रयोग करणारा राकेश ऊर्फ पंडित नामक कथित जादूगार जखमी झाला. गुरुवारी रात्री ७.१५ च्या सुमारास जरीपटक्यात ही घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. इंदोऱ्यातील मायानगरात निता पाटील यांच्या घरी राकेश ऊर्फ पंडित वशिष्ठ तीन वर्षांपासून भाड्याने राहतो. तो स्वत:ला जादूगार, सायंटिस्ट म्हणवून घेतो. नेहमी वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या पंडितने गुरुवारी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास आई बाहेर गेल्याची संधी साधून घरात स्फोटकाचा (बारुद) प्रयोग सुरू केला. अचानक जोरदार स्फोट झाल्याने पंडित राहत असलेले घर जमिनदोस्त झाले. सोबतच बाजूच्या घरातील साहित्य खाली पडले आणि खिडक्यांची तावदाने फुटली. पंडित घरातील पलंगाखाली दबला. दरम्यान, स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी पलंगाखाली दबलेल्या जखमी पंडितला बाहेर काढले. माहिती कळताच अग्निशमन दल आणि जरीपटका पोलीस घटनास्थळी धावले, काही वेळेनंतर बॉम्बशोधक आणि नाशक पथकही पोहचले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. (प्रतिनिधी) आणखी होणार स्फोट ? प्रथमोपचारानंतर जरीपटका पोलिसांनी पंडितला ताब्यात घेतले. त्याची रात्रीपर्यंत चौकशी सुरू होती. आपण ‘स्टेज आर्टिस्ट’असून, गंधक तसेच सल्फरचे मिश्रण करून धूर काढण्याचा प्रयोग करीत असताना हा स्फोट झाल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, आणखी दोन बाटल्या भरून रसायन अशाच पद्धतीने मलब्यात दबले असून, त्याचाही स्फोट होण्याची भीती त्याने व्यक्त केली. त्यामुळे पोलिसांचीही काही वेळेसाठी धावपळ उडाली. मध्यरात्रीपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.