शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

२०० एकरातील कोबीवर ‘काळे ढग’

By admin | Updated: November 18, 2016 03:12 IST

उमरेड महामार्गालगत असलेल्या पाचगाव येथील शेकडो एकर फुलकोबी, भाजीपाला आणि अन्य पिकांवर सध्या ‘केमिकल लोचा’चे संकट घोंगावत आहे.

पाचगावातील शेतकरी संकटात : कंपनीतील केमिकलचा साचतो थरअभय लांजेवार  उमरेडनागपूर - उमरेड महामार्गालगत असलेल्या पाचगाव येथील शेकडो एकर फुलकोबी, भाजीपाला आणि अन्य पिकांवर सध्या ‘केमिकल लोचा’चे संकट घोंगावत आहे. यामुळे असंख्य शेतकरी हतबल झाले असून तातडीने कडक पाऊल उचलण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. याप्रकरणी ४२ शेतकऱ्यांनी तक्रार केली असून पाचगाव, वडेगाव, आजनी, पिपरी परिसरातील सुमारे २०० एकर शेतीचा पट्टा एका कंपनीतून निघणाऱ्या घातक रसायनामुळे प्रभावित झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेल्या पाचगावातील ही वस्तुस्थिती असून शेतकऱ्यांवरच आता संकट ओढवल्याने सर्वत्र असंतोष व्यक्त होत आहे.पाचगाव येथून केवळ एक किमी अंतरावर कुही तालुक्यातील वडेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत एक मॅगनीज कारखाना आहे. या कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर घातक रसायन धुराच्या माध्यमातून बाहेर पडत आहे. कारखान्याच्या चिमणीतून निघणारा धूर थेट शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवर द्रवरूपात पडत आहे. या केमिकलमुळे पिके उद्ध्वस्त होत असून आतापर्यंत सुमारे ५० हेक्टर क्षेत्रातील फुलकोबीवर काळपट रंगाच्या रसायनाचा थर जमा झाला आहे. काळवंडलेल्या फुलकोबीवर पाण्याचा मारा केल्यानंतरही त्याच्यातील काळपटपणा निघत नसल्याने लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. काळवंडलेली फुलकोबी व्यापारी बाजारपेठेत ठेवायला तयार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे.याशिवाय अनेकांच्या शेतात भाजीपाला, कापूस आदी पिकेही प्रभावित झाली असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी, कुहीचे तहसीलदार मल्लिक वीरानी, कृषी अधिकारी आदींकडे निवेदन देत समस्या मांडली. दत्तक योजनेसाठी ‘खास’ गाव ठरलेल्या पाचगावात सुमारे ५० वर्षापासून फुलकोबीला अधिक पसंती आहे. अन्यथा आंदोलन!सदर मॅगनीज कारखान्याची चिमणी नियमानुसार बसविण्यात आली नाही. यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. कंपनीने तातडीने नुकसासभरपाई द्यावी, योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अन्यथा आंदोलन करू, असा इशारा सरपंच पुण्यशीला मेश्राम, उपसरपंच रामाजी हटवार तसेच शेतकरी दिगांबर हटवार, शांताराम हटवार, रवींद्र हटवार, संदीप हटवार, राजेश हटवार, बळीराम माटे, बालू गाडेकर, चक्रधर गाडेकर आदींनी दिला आहे.