शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅक बेल्ट चॅम्पियन डीजीपी म्हणतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:24 IST

पोलीस दल सक्षम करणार नरेश डोंगरे। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ज्यूडोमध्ये ब्लॅक बेल्ट आणि बॉक्सिंगमध्ये ...

पोलीस दल सक्षम करणार

नरेश डोंगरे।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ज्यूडोमध्ये ब्लॅक बेल्ट आणि बॉक्सिंगमध्ये नॅशनल चॅम्पियनशिप पटकावणारे हेमंत नगराळे यांनी राज्याच्या पोलिस दलाचे सर्वोच्च पद प्राप्त करण्यातही यश मिळवले. आता पोलीस दलाला सर्वच दृष्टिकोनातून सक्षम करणार, अशी सूचक प्रतिक्रिया नवनियुक्त पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी लोकमतला दिली.

हायस्कूलपासून तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नगराळे यांनी पहिली नोकरी कोराडी थर्मल पॉवरमध्ये अभियंता म्हणून केली. नंतर ते पोलीस दलाकडे वळले. आज नगराळे यांची आज राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) म्हणून नियुक्ती झाली. नगराळे यांचे जन्मगाव चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे होय. तेथे त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय शिक्षण घेतले. नंतर नगराळे यांचे कुटुंबीय नागपुरात आले. त्यांचे वडील त्यावेळी बेरार प्रांतात एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर म्हणून सेवारत होते. त्यांना दिलीप नगराळे नामक मोठे बंधू तर कीर्ती रमेश भालेकर या मोठ्या भगिनी आहेत. ही संपूर्ण मंडळी नागपुरातच राहतात.

एक उत्कृष्ट ज्यूडोपटू म्हणून त्यांचा कॉलेज लाईफमध्ये नागपुरात चांगला दरारा होता. बनावट मुद्रांक घोटाळ्याच्या तपासामुळे राज्य पोलिस दलात प्रकाशझोतात आलेले तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चौधरी हे नगराळे यांचे गुरू आहेत. चौधरी यांच्यापासून त्यांनी ज्यूडो आणि बॉक्सिंगचे धडे गिरविले. येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे ज्यूडोचा सराव करायचे. त्यांनी ज्यूडोमध्ये ब्लॅक बेल्ट पटकावला आहे. तर महाराष्ट्रातर्फे खेळताना त्यांनी उत्तर भारतात बॉक्सिंगची नॅशनल चम्पियनशिपही पटकावली आहे. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांनी नक्षलग्रस्त चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे एएसपी म्हणून सेवा दिली आहे. पोलीस महासंचालक बनणारे ते नागपूर विदर्भातील पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. या संबंधाने त्यांच्याशी लोकमतने आज संपर्क केला. ‘ज्यूडो आणि बॉक्सिंगमध्ये चॅम्पियनशिप मिळवणारे नगराळे पोलीस दलाला कसे मजबूत बनविणार’, असा थेट प्रश्न केला असता, ‘आज जास्त बोलणे योग्य होणार नाही. मात्र राज्य पोलिस दलाला सर्वांगाने सक्षम बनविणार’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

----

खूप गर्व वाटतो : पुरुषोत्तम चौधरी

हेमंत नगराळे राज्याच्या पोलिस दलाच्या सर्वोच्चपदी विराजमान झाल्याचा खूप गर्व वाटतो, अशी प्रतिक्रिया नगराळे यांना ज्यूडोचे धडे देणारे निवृत्त पोलिस अधिकारी पुरुषोत्तम चौधरी यांनी दिली. तर त्यांचा आम्हाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया नगराळे यांचे जावई आणि मध्य भारताचे निवृत्त मुख्य स्फोटक नियंत्रक रमेश भालेकर यांनी दिली.

---