शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

भाजप पदाधिकाऱ्याला नासुप्र व पोलिसांचे अभय

By admin | Updated: July 1, 2014 01:01 IST

एका दलित महिलेचे घर बळजबरीने पाडून तिला रस्त्यावर आणण्यात आले. उत्तर नागपुरातील एका बड्या भाजप पदाधिकाऱ्याने हा सर्व खेळ केला. या घटनेला २३ दिवस लोटले आहे.

दलित महिलेचे घर पाडले : नागार्जुन कॉलनी परिसरात संतापनागपूर : एका दलित महिलेचे घर बळजबरीने पाडून तिला रस्त्यावर आणण्यात आले. उत्तर नागपुरातील एका बड्या भाजप पदाधिकाऱ्याने हा सर्व खेळ केला. या घटनेला २३ दिवस लोटले आहे. एकीकडे पीडित महिला न्यायासाठी वणवण भटकत आहे, तर दुसरीकडे नासुप्र आणि जरीपटका पोलीस या पदाधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई न करता हे प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नात आहे. एकूण ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ पाहता या दलित महिलेला न्याय मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे नागार्जुन कॉलनी नारा रोड परिसरातील नागरिकांमध्ये रोष आहे. सुजाता नागदिवे असे या पीडित महिलेचे नाव आहे. त्या नागार्जुन कॉलनी नारा रोड येथे पती आणि मुलासोबत मागील १५ वर्षांपासून राहात होत्या. त्यांची मुलगी सुकेशनी करवाडे आणि तिचा मुलगासुद्धा त्यांच्यासोबतच राहात होते. परंतु एका बिल्डरची त्यांच्या झोपड्यावर नजर गेली आणि षड्यंत्र रचून त्याने त्यांचे घर पाडले. सध्या त्या श्रावस्तीनगर झोपडपट्टीतील आपल्या एका नातेवाईकाच्या घरी आश्रयाला आहेत. नागदिवे यांची भेट घेतली असता पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी आपली व्यथा सांगितली. त्या म्हणाल्या, नागार्जुन कॉलनीमध्ये मी गेल्या अनेक वर्षांपासून राहात आहे. जवळपासही काही घरे होती. आमच्या घरामागच्या बाजूलाच बिल्डर आणि भाजपा युवा मोर्चा उत्तर नागपूरचे अध्यक्ष विक्की कुकरेजा यांची एक फ्लॅट स्कीम सुरू होती. जसजशी स्कीम पूर्ण होऊ लागली तशी कुकरेजा यांच्याकडून घर सोडून जाण्याबाबत धमकी मिळायला सुरुवात झाली. सुरुवातीला याकडे आम्ही दुर्लक्ष केले. परंतु जवळपासच्या काही लोकांनी घर सोडून पळ काढला तेव्हा भीती वाटायला लागली. जरीपटका पोलिसांकडे तक्रार केली. परंतु काहीही कारवाई झाली नाही. एक नव्हे तर चारवेळा तक्रारी केल्या, मात्र कुणीही ऐकले नाही. अखेर ८ जून रोजी कुकरेजा यांच्या निर्देशावरून काही असामाजिक तत्त्वांच्या मंडळींनी बुलडोझर आणून घर पाडले. आम्ही रस्त्यावर आलो. आमच्या हक्काचे घर होते, परंतु कुणीही आमचे ऐकले नाही. आमच्याच घरासाठी आज शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. एकेका कागदासाठी अधिकारी, कर्मचारी पिळवणूक करीत आहेत. आज २३ दिवसांपासून आम्ही घराबाहेर आहोत.सध्या जाऊकडे आश्रयाला आहोत. परंतु असे किती दिवस चालणार? भाजप नेते लोकांच्या मदतीसाठी धावून जातात, असे ऐकले होते. पण येथे तर ते लोकांचे घर बळकावत आहेत आणि अशा पदाधिकाऱ्यांना पक्ष संरक्षण देत आहे, हे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी विचारला. (प्रतिनिधी)