शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षावरून भाजप-काँग्रेस आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:06 IST

भाजपचा चक्काजाम तर काँग्रेसची ब्लॉक स्तरावर निदर्शने लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याच्या विरोधातील आंदोलनाच्या ...

भाजपचा चक्काजाम तर काँग्रेसची ब्लॉक स्तरावर निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याच्या विरोधातील आंदोलनाच्या माध्यमातून भाजप-काँग्रेस आमने-सामने आल्याचे चित्र रविवारी नागपुरात बघायला मिळाले. भाजपने व्हेरायटी चौकात विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केले. ओबीसी आरक्षण रद्द होण्याला राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा हल्लाबोल भाजप नेत्यांनी केला. तर काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात संविधान चौकात तसेच् शहरात ब्लाॅक स्तरावर निदर्शने करण्यात आली. ओबीसी आरक्षण रद्द होण्याला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा घणाघात करण्यात आला. आरक्षणाच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

...

आरक्षण द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा

संपूर्ण देशात ओबीसी आरक्षण कायम असताना केवळ महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील ओबीसींचे आरक्षण रद्द झालेले आहे. एकतर ओबीसी आरक्षण द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, आरक्षण जोवर पूर्ववत होत नाही, तोवर हा संघर्ष असाच रस्त्यावर दिसत राहील, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर दयाशंकर तिवारी, शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे,मनपातील सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

व्यासपीठावर माजी आमदार सुधाकर देशमुख, गिरीश व्यास,विकास कुंभारे,माजी आमदार सुधाकर देशमुख,डॉ मिलिंद माने,अशोक मेंढे,प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम,अर्चना डेहनकर,नंदा जिचकार,बाल्या बोरकर,रमेश चोपडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, गोपाल बोहरे,कामिल आंसारी, नाना उमाटे, भोजराज डुम्बे, अश्विनी जिचकार,मुन्ना यादव, दिव्या धुरडे, परिणिता फुके,घनश्याम चौधरी,सुधाकर बैतुले, संजय चौधरी,संजय अवचट,प्रमोद पेंडके,संजय बंगाले,राम आम्बुलकर, सुनील मित्रा,किशोर वानखेडे, विनोद कन्हेरे, किशोर पलांदुरकर,देवेन दस्तूरे,नीता ठाकरे, राजेश हातिबेड यादी उपस्थित होते.