शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बिहारची ‘बहार’ नागपुरातही

By admin | Updated: November 9, 2015 05:30 IST

बिहार निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव आणि महाआघाडीने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी

नागपूर : बिहार निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव आणि महाआघाडीने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपराजधानीत जोरदार जल्लोष केला. सकाळच्या सुमारास संघस्थान असलेल्या रेशीमबाग स्मृतिमंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच आतषबाजी करण्यात आली. दुपारी व्हेरायटी चौकात मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. लोकसभा व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमधील अपयशानंतर मागील आठवड्यात नगर पंचायत निवडणुकांमध्ये मिळालेले यश व आता बिहारमधील दणदणीत विजय यामुळे शहर कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.बिहारमध्ये निकाल लागला असला तरी संघभूमी असल्यामुळे नागपूरकडे देशाचे लक्ष लागले होते. सकाळी निकालांचे कल समोर येताच, महाआघाडीचा विजय निश्चित झाला व रेशीमबाग परिसरात युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आले. लोकांची शाळा समोरून कार्यकर्त्यांनी मिरवणुकीला सुरुवात केली व बंटी शेळकेच्या नेतृत्वातील कार्यकर्त्यांनी केशवद्वाराजवळ अक्षरश: दिवाळी साजरी केली. ढोलताशांच्या तालावर नाचत काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. व्हेरायटी चौकात दुपारी ४ च्या सुमारास शहर कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर एकत्र आले होते. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह शहर कॉंग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनी यावेळी जल्लोष केला व विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी ‘गुब्बारा फुटला’ असे लिहिलेले ‘पोस्टर्स’देखील कार्यकर्त्यांनी आणले होते. आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनीदेखील संविधान चौकात दुपारी १ वाजता आतषबाजी करुन विजयाचा जल्लोष केला. हा लोकशाहीचा विजय असल्याचे मत यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.