शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

किडनी ट्रान्सप्लान्ट अडले ‘एमपीसीबी’मुळे

By admin | Updated: July 11, 2015 03:09 IST

सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सुरू होणाऱ्या किडनी ट्रान्सप्लान्ट सेंटरला (मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) प्रमाणपत्रच मिळाले नाही.

सुपर स्पेशालिटी रुग्णालय : गडकरींच्या निर्देशानंतरही प्रत्यारोपण केंद्राला मंजुरीची प्रतीक्षानागपूर : सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सुरू होणाऱ्या किडनी ट्रान्सप्लान्ट सेंटरला (मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) प्रमाणपत्रच मिळाले नाही. परिणामी या केंद्राला मंजुरी देण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने हरकत घेतली आहे. ४ जुलै रोजी झालेल्या मेडिकलच्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी तीन दिवसांत मंजुरी देण्याचे निर्देश दिले होते, हे विशेष.राज्यातील हजारो रु ग्ण डायलिसिसवर जगत आहेत. यातील हजाराहून अधिक रु ग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. याला घेऊनच राज्यात प्रथमच नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयांत किडनी प्रत्यारोपण केंद्र सुरू होणार होते. गेल्या हिवाळी अधिवेशनात वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तीन महिन्यात हे केंद्र सुरू होण्याची घोषणा केली होती. परंतु सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही केंद्राला मंजुरीच मिळाली नाही. विशेष म्हणजे, मागील महिन्यात शासनाची चार सदस्यीय समितीने सुपर स्पेशालिटी रुग्णालयात भेट देऊन या केंद्राची पाहणी केली. यात आढळून आलेल्या त्रुटी त्यांनी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या समोर मांडल्या. अधिष्ठात्यांनी व या केंद्राशी संबंधित डॉक्टरांनी त्रुटी दूर करण्याची लेखी हमीही दिली. परंतु सार्वजनिक आरोग्य विभागाने मंजुरीच दिली नाही. शनिवारी झालेल्या अभ्यागत मंडळात हा विषय समोर आला. त्यावेळी गडकरी यांनी, किडनी प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग मुहूर्त शोधत आहे का, असा थेट सवाल करीत तीन दिवसांत मंजुरी देण्याचे निर्देश दिले होते. परंतु आता आरोग्य विभागाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मंजुरी नसल्याचे कारण पुढे केले आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतरच केंद्राला मंजुरी देण्यात येईल, असे पत्र मेडिकल प्रशासनाला पाठविले आहे. (प्रतिनिधी)