शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बॅटरी कारची सेवा अखेर बंद

By admin | Updated: April 28, 2016 02:42 IST

एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने नागपूूर रेल्वेस्थानकावर सुरू असलेली बॅटरी कार बंद करण्याचा निर्णय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

निर्णय मागे घ्यावा : रुग्ण, अपंग अन् ज्येष्ठ नागरिकांची फरफटनागपूर : एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने नागपूूर रेल्वेस्थानकावर सुरू असलेली बॅटरी कार बंद करण्याचा निर्णय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. स्थानिक रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांची मोठ्या प्रमाणात अडचण होत असून त्यांच्या सुविधेसाठी, बंद करण्यात आलेली बॅटरी कार त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे. उपराजधानीत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उर्वरित महाराष्ट्रासह विदर्भातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णांना एका प्लॅटफार्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाणे कठीण होते. त्यामुळे रुग्णांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने शहरातील एका समाजसेवीच्या माध्यमातून बॅटरी कारची व्यवस्था केली होती. ही कार बॅटरीवर चालत असून तिला विद्युत प्रवाहाच्या माध्यमातून चार्जिंग करावे लागते. रोज सुमारे १०० च्या वर रुग्ण तसेच ज्येष्ठ नागरिक या सेवेचा लाभ घेतात. दिवसाकाठी ३०० ते ४०० कॉल या बॅटरी कारसाठी येतात. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक सहायक वाणिज्य व्यवस्थापकांनी दोन्ही बॅटरी कार चालकांना सेवा बंद करण्याचे लेखी आदेश दिले. उन्हाळ््यात रेल्वेगाड्यांमध्ये प्रकृती बिघडण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून दिवसाला सरासरी आठ ते दहा डॉक्टर कॉल्सची नोंद होत आहे, अशा स्थितीत बॅटरी कार बंद करून स्थानिक प्रशासन काय साध्य करणार आहे, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे नवनियुक्त ‘डीआरएम’ ब्रिजेश कुमार गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी मोबाईल ‘रिसिव्ह’ न केल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)प्रवाशांना ६५ रुपये भुर्दंडबॅटरी कारमुळे रुग्ण, अपंग प्रवासी, ज्येष्ठ नागरिकांना नि:शुल्क कोचपर्यंत जाण्याची सुविधा होती. परंतु आता रेल्वेस्थानकावर उपलब्ध असलेल्या व्हील चेअरमुळे कुलीच्या मदतीने कोचपर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना ६५ रुपये मोजावे लागणार आहेत. अनेकदा जवळ सामान असल्यामुळे अनेक प्रवासी आपल्या रुग्णांना कुलीच्या साहाय्याने कोचपर्यंत घेऊन जातात. त्यामुळे हा अतिरिक्त भुर्दंड आता प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. बॅटरी कार बंद करण्याचा निर्णय कशासाठी ?रेल्वेस्थानकावर बॅटरी कारमुळे मोठा अपघात झाल्याची कुठलीही नोंद मागील तीन वर्षात झालेली नाही. त्यामुळे गरीब रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी मदतीची ठरणाऱ्या बॅटरी कार बंद करण्याचा निर्णय कशामुळे घेण्यात आला, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.