शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बँकेला २९ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2016 03:12 IST

कर्ज घेताना बँकेकडे तारण ठेवलेली मालमत्ता परस्पर विकून एका कुख्यात आरोपीने बँक आॅफ इंडियाच्या कळमना शाखेला २९ लाखांचा गंडा घातला.

नागपूर : कर्ज घेताना बँकेकडे तारण ठेवलेली मालमत्ता परस्पर विकून एका कुख्यात आरोपीने बँक आॅफ इंडियाच्या कळमना शाखेला २९ लाखांचा गंडा घातला. काका ऊर्फ रणवीरसिंग गुरुचरणसिंग चंडोक (वय ४७) असे आरोपीचे नाव आहे. तो बाबा बुद्धाजीनगर, टेकानाका भागात राहतो. त्याने बँक आॅफ इंडियाकडून काही दिवसांपूर्वी कर्ज घेतले होते. कर्जाच्या परतफेडीची हमी म्हणून चंडोकने त्याचे कापसी खुर्द येथील एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये असलेली १५ आणि ७१ क्रमांकाची दोन दुकाने तारण ठेवली होती. चंडोकने बँकेच्या कर्जाची परतफेड तर केलीच नाही. उलट तारण ठेवलेल्या दुकानांची बनावट कागदपत्रे तयार करून ती परस्पर विकून टाकली. दरम्यान, कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेच्या वसुली पथकाने चौकशी केली असता ही धक्कादायक बाब उघड झाली. चंडोकविरुद्ध गुन्हा दाखल नागपूर : बँक आॅफ इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक रविशंकर आर. कुभारे (वय ५८, रा. विश्वास नगर) यांनी कळमना ठाण्यात शुक्रवारी फसवणुकीची तक्रार नोंदवली. ठाणेदार सुनील बोंडे यांनी प्रकरणाची चौकशी करून घेत गुन्हा दाखल केला. त्यानंतर चंडोकला अटक करण्यात आली. रणवीरसिंग चंडोक हा काका चंडोक नावाने कुख्यात आहे. त्याच्याविरुद्ध जरीपटका, पाचपावली ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. तीन महिन्यांपूर्वी त्याच्याविरुद्ध पाचपावली ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात एका पोलिसाने मध्यस्थाची भूमिका वठवली होती. पीडित महिलेला धाक दाखवून तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दडपण आणले होते. या प्रकरणाची वरिष्ठांकडेही तक्रार झाली होती. मात्र, चंडोकविरुद्ध पाचपावली पोलिसांनी ठोस कारवाई केली नव्हती. चंडोकची टेकानाका परिसरात प्रचंड दहशत आहे. (प्रतिनिधी)