शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बँक कर्मचाऱ्यांनो तणावाला दूर ठेवा

By admin | Updated: November 19, 2016 03:08 IST

५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर बँकांमधील काम प्रचंड वाढले आहे.

मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला : आनंदी राहून काम करानागपूर : ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर बँकांमधील काम प्रचंड वाढले आहे. लोकांची गर्दी सांभाळत पैशांचा व्यवहार करण्याच्या या जोखमीच्या कामाला तोंड देताना बँकेचे कर्मचारी प्रचंड तणावाखाली आले आहेत. यातून अनेकांना आजार वाढले असून काही मृत्यूलाही सामोरे जात आहे, अशावेळी बँक अधिकाऱ्यांनो तणावाला दूर ठेवा, आनंदी राहून काम करा, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांनी दिला आहे.बँकेतील कर्मचारी नियमित वेळेच्या तासभर आधीपासून ते रात्री उशिरापर्यंत कामात व्यस्त आहेत. दिवसभर रांगांमध्ये लागणाऱ्या नागरिकांना नोटा बदलून द्यायच्या किंवा त्यांचे पैसे जमा करून घ्यायचे व सायंकाळी व्यवहार बंद झाल्यानंतर खर्चाचा ताळेबंद करणे असा दिनक्रम सुरू आहे. यातच अनेक बँकांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कामाची जबाबदारी वाढली आहे. परिणामी, मनावर याचा तणाव निर्माण होणे अपरिहार्य आहे. परंतु तणावावर नियंत्रण आणण्याचे कौशल्य आपल्याला अवगत झाले पाहिजे तरच पुढील आयुष्य आनंदात घालवता येईल, असे मत केईएम हॉस्पिटलचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंधडा यांचे आहे. ते म्हणाले, कामाची चिंता करीत विविध रोगांना आमंत्रण देण्यापेक्षा त्याचे नियोजन करण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजे. सकारात्मक विचार मनात असला की तणाव निर्माण होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. धावपळीच्या या युगात मनासारखे काम झाले नाही तर मानसिक ताण वाढतो. म्हणून तणावाचा निचरा होणे आवश्यक आहे. आपल्या क्षमतेनुसार काम करा. आकस्मिक घडणाऱ्या घटनांकडे शांत चित्ताने पहा. आधी काय साध्य करायचे ते ठरवा. त्यानुसार ताण न घेता ते साध्य करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी म्हणाले, तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो. मानसिक एकाग्रता ढळते. डोकेदुखी सुरू होते. कामात अडचणी येतात. थकवा वाटू लागतो. मन व शरीरावर तणावाचे अनिष्ट परिणाम सुरू होतात. अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते. चिडचिडेपणा येतो. संताप वाढतो. आरोग्य बिघडते. याशिवाय मानसिक आजारही घेरतात. बँक कर्मचाऱ्यांचे काम हे जोखमीचे असलेतरी त्यांनी वैयक्तिक घेऊ नये. हे काम देशाचे आहे, सार्वजनिक हिताचे आहे असे समजून घेणे आवश्यक आहे. आनंदाने कामाला सामोर जा. सतत काम करणे टाळा. विश्रांतीही घ्या, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)