शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रोसिटीच्या समर्थनार्थ बहुजनाचा एल्गार

By admin | Updated: January 14, 2017 17:15 IST

अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टच्या समर्थनार्थ शनिवारी नागपुरात बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टच्या समर्थनार्थ शनिवारी नागपुरात बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बौद्ध, दलित, आदिवासी, मुस्लीम, ओबीसी आदी समजाचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
 
रेशीमबाग चौक येथून निघालेला हा मोर्चा अशोक चौक, बैद्यनाथ चौक, सीताबर्डी, व्हेरायटी चौक मार्गे संविधान चौक येथे पोहोचला. संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर एका शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करण्यात आले. 
 
मोर्चा सुरू होण्यापूर्वी रेशिमबाग मैदान येथे जाहीर सभा पार पडली. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे अध्यक्षत्स्थानी होते. या सभेला भारत मुक्ती मोर्चा व बामसेफचे प्रमुख वामन मेश्राम यांनी मार्गदर्शन करीत राज्य सरकारवर चौफेर टीका केली. ते म्हणाले, अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट शिथील करण्याचे षडयंत्र सरकार रचत आहे. परंतु या कायद्यातील एक ऊकार किंवा स्वल्पविराम सुद्धा कमी केला तर सोडणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मराठा व ओबीसी बांधवांमध्ये सरकार भांडण लावत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 
 
यावेळी भदंत सुरेई ससाई, रवी शेंडे, नारायण बागडे, अर्चना भोयर, श्रीधर साळवे, सुनील पेंदारे, प्रा. रमेश पिसे, मंगेश गेडाम, रेव्हरंट गायकवाड, इमाम मसुद, मौलाना हफीज असरफ आदींनीही मार्गदर्शन केले. 
 
मोर्चाच्या प्रमुख मागण्या 
अ‍ॅट्रोसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा, यासाठी स्वतंत्र न्यायालयाची व्यवस्था करावी 
भटके विमुक्त जातीलाही अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत संरक्षण देण्यात यावे 
सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करून लोकसंख्येनुसार आरक्षण देण्यात यावे. 
ओबीसींची जाती आधारित जनगणना करण्यात यावी त्यांना लोकसंख्येप्रमाणे आरक्षण देण्यात यावे 
- मराठ्यांना आरक्षण मिळावे परंतु ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता 
- आदिवासींचे आरक्षणाचा कोटा वाढवण्यात यावा. त्यात धनगर व हलबांना आरक्षण देण्यात यावे. 
- बुद्धगया येथील महबोधी विहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे. 
- बौद्ध, मुस्लीम, सिख, इसाई, जैन, लिंगायत यांच्यावर होत असलेले अत्याचार रोखण्यासाठी कम्युनल रॉयट्स प्रोटेक्शन कायदा बनविण्यात यावा. 
- डॉ. आंबेडकर बौद्ध विद्यापीठ व पाली विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी. 
पुरंदरे यांना देण्यात आलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घेण्यात यावा.