शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरनजीकच्या रनाळा येथे बाळाचा खून करून उकिरड्यात पुरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 21:52 IST

औषधोपचारानंतरही बाळाची प्रकृती खालावत असल्याने चक्क आईने २३ दिवसांच्या बाळाचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह उकिरड्यात पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही घटना कामठी हद्दीतील रनाळा येथे घडली.

ठळक मुद्देआरोपी आईस अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कामठी) : जन्माच्या दुसऱ्या दिवसापासूनच बाळाचे (मुलगी) आजारपण सुरू झाले. औषधोपचारानंतरही बाळाची प्रकृती खालावत असल्याने चक्क आईने २३ दिवसांच्या बाळाचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह उकिरड्यात पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर, तिने बाळाचे अपहरण झाल्याचा कांगावा करीत पोलिसात तक्रार नोंदविली. मात्र, बिंग फुटले आणि जन्मदात्री आईच मारेकरी असल्याचे स्पष्ट होताच तिला अटकही करण्यात आली. ही घटना कामठी (नवीन) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रनाळा येथे बुधवारी (दि. १८) मध्यरात्री घडली असून, गुरुवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली.पायल अनिल कनोजे (२२, रा. अरोली, ता. मौदा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे (आई) नाव आहे. तिने जन्माष्टमीच्या दिवशी मुलीला जन्म दिला. दुसºयाच दिवशी मुलीची प्रकृती अचानक बिघडल्याने अनिल व पायल यांनी तिला कामठी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती केले. काही दिवस हॉस्पिटलमध्ये थांबल्यानंतर पायल अरोलीला परत गेली.दरम्यान, ती बुधवारी (दि. १८) तिच्या सासूला सोबत घेऊन कामठी येथे हॉस्पिटलमध्ये आली. मात्र, अनिल मुलीला घेऊन त्याच्या रनाळा (ता. कामठी) येथे राहणाऱ्या मावशीकडे मुक्कामी गेल्याने तीही रनाळ्याला गेली. सकाळी तिने सासूला जागे करून मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची बतावणी करीत हंबरडा फोडला. त्यामुळे घरातील सर्वांनी बाळाचा शोध घ्यायला सुरुवात केली. सर्वत्र शोध घेऊनही बाळ कुठेही आढळून न आल्याने सर्वांनी पोलीस ठाणे गाठून बाळाचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार नोंदविली.याप्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी भादंवि ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंदवून पायलला अटक केली. शिवाय, मृतदेह खड्ड्यातून काढत उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविला. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके करीत आहेत.अशी केली हत्याबुधवारी रात्री बाळ पायलजवळ झोपले होते. तिने मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास बाळाचा गळा आवळून खून केला. नंतर बाळाचा मृतदेह शेजारी राहणाऱ्या रणजित लोणारे यांच्या गोठ्याजवळील उकिरड्यात खड्डा करून पुरला. त्यानंतर ती घरी येऊन पुन्हा झोपी गेली. सकाळी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पायलची उलटतपासणी केली आणि बिंग फुटले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून