शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

बाबा डोंगरेने जमविली कोट्यवधीची माया

By admin | Updated: February 23, 2015 02:42 IST

प्रतिबंधित कारवाईची चॅप्टर केस बंद करण्यासाठी पाचपावली विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाबा डोंगरे याला १० हजार रुपयांची लाच घेताना शनिवारी अटक केली होती.

नागपूर : प्रतिबंधित कारवाईची चॅप्टर केस बंद करण्यासाठी पाचपावली विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाबा डोंगरे याला १० हजार रुपयांची लाच घेताना शनिवारी अटक केली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डोंगरेंच्या नागपूर, चिमूर व गडचिरोली येथील घराची झडती घेतली असता कोट्यवधी रुपयांची मालमत्ता त्याच्याकडे आढळून आली. दरम्यान रविवारी डोंगरेला न्यायालयात हजर केले असता २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अ‍ॅन्टी करप्शन ब्यूरोने शनिवारी बाबा डोंगरे याला अटक केली होती. त्याच्यावर जरीपटका पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. सापळा कार्यवाहीनंतर अ‍ॅन्टी करप्शन ब्यूरो नागपूरने त्याच्या मोहननगर येथील निर्मल अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये, गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील घरी व चिमूर येथील त्याच्या ताडोबा बार अ‍ॅण्ड रेस्टॉरेंट व घराची झडती घेतली. नागपूर येथील घरझडतीत बाबा डोंगरे याचे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खात्यात २,६७,२७२ लाख रुपये असल्याचे आढळले. घरझडतीत १० ग्रॅम सोन्याची चेन, घरगुती वापरात असलेल्या चैनीच्या वस्तू असा एकंदरीत १८,९२,७३८ रुपयांची मालमत्ता आढळली. कुरखेडा येते बाबा डोंगरे याच्या नावाने घर आहे. त्याची किंमत अंदाजे सात लाख रुपये आहे व ७७००० रुपयांची इतर मालमत्ता आढळून आली. चिमूर येथे त्याचे ३००० चौरस फुटात दुमजली घर आहे. तळमजल्यावर त्याचे बार अ‍ॅण्ड रेस्टॉरेंट आहे. आठ खोल्यांमध्ये लॉजिंग आहे. बांधकामास ४० ते ५० लाख रुपये खर्च केला असल्याचे निदर्शनास आले. (प्रतिनिधी)डोंगरे प्रत्येक ठिकाणी राहिला चर्चेतगुन्हे शाखेत कार्यरत असताना क्रिकेट सट्टा रेडमध्ये मिळालेल्या लॅपटॉपमधून महत्त्वाचा डाटा डिलीट करण्यात आला होता. त्यामुळे मोठे प्रकरण उघड होऊ शकले नाही. गडचिरोलीमध्येही एक चर्चित प्रकरणात तो गुंतलेला होता. हिंगणघाटमध्ये निरीक्षक असताना क्रिकेट बुकीच्या कारला आग लागून एका मॉडेलचा मृत्यू झाला होता. याप्रकरणातही डोंगरे चर्चेत होता. हे प्रकरण सीआयडीकडे तपासाला पाठविले होते. सीआयडी या प्रकरणाचा तपास करण्यात अयशस्वी ठरली.